Tuesday, September 10, 2024
Homeक्राईम न्यूजलोणी काळभोर ठाण्यातील जप्त केलेल्या प्लॅस्टिकच्या डब्यांचा लिलाव

लोणी काळभोर ठाण्यातील जप्त केलेल्या प्लॅस्टिकच्या डब्यांचा लिलाव

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लोणी काळभोर, (पुणे): कॉपीराईट अॅक्टनुसार लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील जप्त करण्यात आलेले एशियन पेन्ट कंपनीच्या रिकाम्या प्लॅस्टिक डब्यांचा लिलाव करण्याचा आदेश न्यायालयाकडून नुकताच देण्यात आला आहे. त्यानुसार रिकामे प्लॅस्टिक डब्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी दिली आहे.

उरुळी देवाची (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एका पत्र्याच्या शेडमध्ये बनावट एशियन पेंट तयार होत असल्याचा धक्कादायक प्रकार 24 जून 2024 रोजी उघडकीस आला होता. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कॉपीराईट कायदा 1957 चे कलम 51, 63 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात जप्त असलेले प्लॅस्टिकचे रिकामे एशियन पेन्ट कंपनीचे डब्बे यांचा लिलाव करून मिळणारी रक्कम सरकारकडे जमा करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट 07 शिवाजीनगर पुणे यांनी दिले आहेत.

जप्त करण्यात आलेल्या सदर एशियन पेन्ट कंपनीचे प्लॅस्टिकचे रिकामे डब्बे यांचा लिलाव 27 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता लोणी काळभोर पोलीस ठाण्यात करण्यात येणार आहे. तरी इच्छुक लिलावदारांनी लिलावासाठी हजर रहावे. असे आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments