Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजलोणी काळभोरमध्ये दारू पिल्यानंतर दोन मित्रांमध्ये वाद; डोक्यात दगड मारल्याने एकजण गंभीर...

लोणी काळभोरमध्ये दारू पिल्यानंतर दोन मित्रांमध्ये वाद; डोक्यात दगड मारल्याने एकजण गंभीर जखमी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लोणी काळभोर : दारू पिल्यानंतर दोन मित्रांमध्ये झालेल्या वादातून एकाच्या डोक्यात दगड व लोखंडी हुकाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरात मंगळवारी (ता. १४) रात्री सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एकाच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुलाब सतीश परदेशी (वय ३२, धंदा, मजुरी, रा. माळीमळा लोणीकाळभोर, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर अंकुश बाजीराव मगर (वय ५५, रा. माळीमळा काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुलाब परदेशी व अंकुश मगर हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत. गुलाब परदेशी हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर अंकुश मगर हे लोणी काळभोर येथील सिमेंटच्या मालधक्क्यात हमाल म्हणून काम करतात. दोघांनाही दारूचे व्यसन आहे.

दरम्यान, मंगळवारी फिर्यादी गुलाब परदेशी यांचा मित्र अंकुश मगर याने त्यांना दारू पिण्यासाठी बोलावून घेतले. त्यानंतर दोघेही मद्यधुंद झाले. दारु पील्यानंतर तुझ्या खिश्यामध्ये काय आहे? असे बोलून गुलाब परदेशी याने अंकुश मगर याच्या अंगाशी झटापट केली. याचा राग आल्याने अंकुश मगर याने गुलाब परदेशी याला शिवीगाळ केली.

त्यानंतर मगर याने त्याच्या हातातील सिमेंट उचलण्याच्या हुकाने परदेशी याच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याच्या आतील बाजूस मारुन दुखापत केली. तसेच त्याने परदेशी याच्या डोक्यात दगड मारुन जखमी केले आणि तुला दोन दिवसात मारुन टाकतो अशी धमकी दिली. या प्रकरणी परदेशी याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अंकुश मगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केतन धेंडे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments