Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजलोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलः चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला उंदीर मारण्याचे औषध...

लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलः चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला उंदीर मारण्याचे औषध देऊन पतीकडून खूनाचा प्रयत्न

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

वारंवार पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा काटा काढण्याचे उद्देशाने तिला उंदीर मारण्याचे औषध पाण्यात प्यायला देऊन महिलेचा खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी पती, सासू, सासऱ्यांसह सहा अारोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आरोपी पतीला लोणीकंद पोलिसांनी अटक केली. हनुमंत अंकुश गिरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.

याप्रकरणी सासू सरस्वती, सासरे अंकुश, दीर आदित्य (तिघे रा. सुलतानपूर, जि. बीड), नणंद सुजाता प्रल्हाद भारती, शिवाजी भारती (रा. वडवणी, जि. बीड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत साक्षी हनुमंत गिरी (वय २३, रा. केसनंद, नगर रस्ता) हिने लोणीकंद पोलीस ठाण्यात सासरचे व्यक्ती विरोधात तक्रार दिली आहे. साक्षीचा पाच वर्षांपूर्वी आरोपी हनुमंत गिरी याच्याशी विवाह झाला होता.

विवाहानंतर पती, सासू, सासरे आणि नातेवाईकांनी तिला कौटुंबिक कारणावरुन सतत त्रास देण्यास सुरुवात केली. तिचा शारिरिक आणि मानसिक छळ केला. तक्रारदार साक्षी हिचा पती हनुमंत कामानिमित्त केसनंद परिसरात स्थायिक झाला होता. हनुमंतने तिच्या चारित्र्याचा संशय घेतला. उंदीर मारण्याचे औषध पाण्यात टाकून साक्षीला देऊन तिचा खूनाचा प्रयत्न केल्याचे साक्षीने तक्रारीत सांगितले आहे. सहायक पोलीस निरीक्षक एस भालेराव पुढील तपास करत आहेत.

पत्नीवर ब्लेडने पतीकडून वार

कोंढवा परिसरात राहणाऱ्या २० वर्षीय महिलेच्या पतीस दारु पिण्याचे व्यसन आहे. संबंधित पती सतत दारु पिऊन घरी येऊन पत्नी सोबत वाद घालत होता. त्यामुळे पत्नी मागील एक वर्षापासून त्याच्यापासून विभक्त राहून धुणे भांडीचे काम करते. ती सदर काम एकाठिकाणावरुन करुन घरी परतत असताना, तिचा पती अनमोल लक्ष्मीकांत गिरी (वय- ३४, रा. कोंढवा, पुणे) हा तिला भेटल व त्याने तिच्याशी वाद घालून ब्लेडने तिच्या मानेच्या डाव्या बाजुस, मागीस बाजूस व उजव्या बाजूस, डाव्या भुवई जवळ, डाव्य हाताचे मनगटापासून कोपऱ्या पर्यंतचे भागावर ब्लेडने वर करुन तिला जखमी केले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अारोपीवर गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments