Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजलोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलः 'हॉटेल बाहेर बाटली का फोडली' म्हणून...

लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलः ‘हॉटेल बाहेर बाटली का फोडली’ म्हणून हॉटेल चालकाकडून 3 ते 4 ग्राहकांना मारहाण

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

‘हॉटेल बाहेर बाटली का फोडली,’ अशी विचारणा करून हॉटेल चालकाने तीन ते चार ग्राहकांना मारहाण करून एकाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडल्याचा धक्कादायक प्रकार वाघोली येथील प्रियांकानगरी येथे घडला.

या प्रकरणी अफरोज तांबोळी (वय ३०, रा. हडपसर) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून रोहित महादेव निंबाळकर (वय २७, रा. वाघोली), वैशाली सोमनाथ ताकवणे (वय ३०, रा. भेकराईनगर), मंगेश आणि स्वप्नील अशा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास वाघोली येथील द टेरेस हॉटेल येथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहित निंबाळकर हा द टेरेस हॉटेलचा चालक आहे. तर, आरोपी वैशाली ताकवणे ही रोहित सोबत घटनेच्या दिवशी हॉटेल काउंटरवर होती. तक्रारदार अफरोज भाऊ आणि मित्र-मैत्रिणींसह द टेरेस हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. तेथे तक्रारदाराचा भाऊ साजिद इब्राहिम तांबोळी यांनी हॉटेल बाहेर बाटली का फोडली, अशी विचारणा करून दोन आरोपींनी काउंटरवर ठेवलेली बिअरची बाटली तक्रारदाराच्या भावाच्या डोक्यात फोडली. त्यानंतर आरोपी महिलेने शिवीगाळ केली. तर, रोहित निंबाळकरने तक्रारदारासह तिघांना हाताने मारहाण केली, असे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार एस दळे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments