Friday, April 19, 2024
Homeक्राईम न्यूजलोणीकंद परिसरातील दोन सराईत गुन्हेगार तडीपार: कार चालकाचे दोन मोबाईल दुचाकीस्वार...

लोणीकंद परिसरातील दोन सराईत गुन्हेगार तडीपार: कार चालकाचे दोन मोबाईल दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरले

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहरातील लोणीकंद हद्दीतील आव्हाळवाडी, वाघोलीसह आसपासच्या भागात दहशत निर्माण करुन नागरिकांना वारंवार त्रास देणाऱ्या दोघा सराईतांना तडीपार करण्यात आले आहे. त्यांनी दहशत निर्माण करुन लोकांच्या जिवीतास धोका निर्माण केला होता. पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी त्यांना तडीपार करण्याचे आदेश दिले.

सराईत गुंड गौरव ऊर्फ गोटया महादेव सातव (वय ३१ रा. डोमखेलवस्ती आव्हाळवाडी ता. हवेली) आणि महेंद्र संभाजी कुटे (वय ३८ रा. आव्हाळवाडी ता. हवेली) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. सातवला दीड वर्षे तर कुटेला वर्षासाठी तडीपार केले आहे. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आव्हाळवाडी, वाघोलीसह आसपासच्या भागात दोघा सराईतांनी दहशत निर्माण केली होती.

गुन्हेगारांच्या कृत्यामुळे लोकांच्या मनातुन कायद्याविषयी संभ्रम निर्माण होवु नये. यासाठी तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली, एपीआय रवींद्र गोडसे यांनी सराईतांचे रेकॉर्ड तयार केले. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे तडीपार करण्यासंदर्भात पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांना प्रस्ताव पाठविला. ही कामगिरी पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, एसीपी संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास करे, एपीआय रवींद्र गोडसे, प्रशांत कापुरे, सागर कडु, शुभम सातव यांनी केली.

कार चालकाचे दोन मोबाईल दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरले

खासगी कंपनीत कामाला असलेल्याला सोडल्यानंतर मोटारीतून जाणाऱ्या चालकाला अडवून दुचाकीस्वारांनी शिवीगाळ केली. त्याच्याकडील १५ हजार रूपये किंमतीचे दोन मोबाइल चोरून नेले. ही घटना येरवड्यातील सादलबाबा चौकात घडली आहे. याप्रकरणी शंकर दास (वय ३०, रा. वडगाव शेरी) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकरदास हा खासगी कंपनीच्या मोटारीवर चालक आहे. १७ फेबुवारीला मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास तो कंपनीतील कामगार सोडून मोटारीतून घरी चालला होता. त्यावेळी सादलबाबा चौकात दुचाकीस्वार चोरट्यांनी त्याला अडवून शिवीगाळ केली. त्याच्याकडील १५ हजारांचे दोन मोबाईल हिसकावून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments