Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरः पुण्यात भरारी पथकाकडून 1 लाख 44 हजारांचा मुद्देमाल...

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरः पुण्यात भरारी पथकाकडून 1 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

आगामी लोकसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथकाने मावळ तालुक्यातील सिंहगड, कासुर्डे, शिरगाव व अंबी या ठिकाणी अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मितीच्या ३ ठिकाणांवर दारूबंदी गुन्ह्याअंतर्गत छापे मारून ३ गुन्ह्यांची नोंद करून १ लाख ४४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईत १०५ लिटर तयार गावठी हातभट्टी दारु, ३ हजार ६०० लिटर रसायन व गावठी हातभट्टी दारु निर्मीतीचे इतर साहीत्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यापुढेही अवैध दारु व्यवसायाविरुद्ध अशाच प्रकारच्या मोहिमा आखून सातत्याने कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने नमूद केले आहे. या कारवाईत दुय्यम निरीक्षक ए. बी. पाटील, व्हि.एम. माने, जवान पी. टी. कदम, एस.एस. पोंधे, ए. आर. थोरात, एस.सी. भाट, आर. टी. तारळकर व महिला जवान यु.आर. वारे यांनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा तपास राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक व्हि. एम. माने व दुय्यम निरीक्षक ए.बी. पाटील करीत आहेत.

तरूणाची सोनसाखळी हिसकावणाऱ्या तिघांवर गुन्हा

दुचाकी अडवून शिवीगाळ करत तिघांनी मारहाण करून तरूणाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याचा प्रकार खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोंबील मार्केट येथील सार्वजनिक रस्त्यावर घडला. याप्रकरणी अभिषेक दशरथ वाघमारे उर्फ मम्या (22, रा. महेश गॅलेक्सी, वडगाव बदुरक), मयुर किरण भोसले (19) आणि सुदर्शन विजय मोठे (24, दोघेही रा. दांडेकर पुल) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत रमेशकुमार गिरधारीलाल घाची (28, रा. ओम साई अपार्टमेंट, साईनगर, कोंढवा) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments