Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजलोकशाहीसाठी राज्यभर राबवली 'निर्भय बनो' मोहिम; पण विश्वंभर चौधरी स्वतः मतदानापासून राहिले...

लोकशाहीसाठी राज्यभर राबवली ‘निर्भय बनो’ मोहिम; पण विश्वंभर चौधरी स्वतः मतदानापासून राहिले वंचित; कारण काय ?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे– लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. राज्यात सुमारे ५३ टक्क्यांच्या जवळपास मतदान झाले आहे. शिरुर आणि पुण्यामधून मतदारांचा कमी प्रतिसाद पाहायला मिळाला आहे. त्यातच सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांना मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

विश्वंभर चौधरी यांचे मतदार यादीत नावच नव्हते. त्यामुळे त्यांना मतदान करता आलेलं नाही. पुण्यात आज मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. काही ठिकाणी मशीन बंद पडल्याच्या घटना पाहिला मिळाल्या. तसेच अनेकांचे नाव मतदार यादीत नव्हते. विश्वंभर चौधरी यांच्यासोबत असाच प्रकार घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चौधरी यांचे नाव मतदार यादीतून गायब होते. त्यांनी दोन मतदान केंद्रावर जाऊन नाव तपासले, पण त्यांचे नाव कोठेही आढळले नाही. त्यामुळे चौधरी यांच्यावर मदतान न करता परतण्याची वेळ आली. चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षभरापूर्वी चौधरी यांचे नाव मतदार यादीमध्ये होतं. त्यामुळे मतदानाच्या दिवशीच त्याचे नाव यादीत का नव्हते, असा प्रश्न पडत आहे.

विश्वंभर चौधरी यांनी वकील असीम सरोदे, पत्रकार निखीळ वागळे यांच्यासोबत ‘निर्भय बनो’ च्या सभा राज्यभर घेतल्या. लोकशाहीसाठी आपला लढा सुरु असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. निर्भय बनोच्या माध्यमातून हाच संदेश त्यांनी राज्यभर दिला होता. महायुतीच्या विरोधात त्यांनी राज्यात सभा घेतल्या होत्या. पण, त्यांना आपल्या मतदारसंघात मतदान करता न आल्याने निराश व्हावं लागलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments