इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नागपूर: शहरात लोकल तेलाच्या डब्ब्यावर ब्रँडेडकंपनीचे स्टिकर लावून तेलाची विक्री सुरू असल्याचे समोर आले आहे. यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई नागपूर पोलिसांच्या क्राईम ब्रँच आणि हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या पथकाने केली आहे. अदानी विलमार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कंपनीचे स्टिकर लावून नागपूर आणि परिसरातील काही तेल विक्रेते ग्राहकांची फसवणूक करत असल्याची तक्रार केली होती. या प्रकरणी निलेश साहू या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी जेंव्हा हुडकेश्वर परिसरात एका गोदामावर छापा घालुन कारवाई केली. तेंव्हा विकले जाणारे तेल हे डब्यात भरले जात या नंतर पोलिसांनी बनावट लेबल लावलेले तेलाचे २८ डब्बे, शेकडो कागदी लेबल्स, पॅकिंग मशीन, तेलाचे डब्बे भरण्यासाठी मोटार पंप, पॅकिंग पट्टी रोल असा एकूण ७लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान, आरोपीवर कॉपीराईट आणि ट्रेडमार्क कायद्यानुसार गुन्हा दाखल करत निलेश साहू या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.