Wednesday, November 29, 2023
Home क्राईम न्यूज लोकप्रिय मालिकेतील कलाकार जल्लोषात स्वागत करणार गणरायाचं

लोकप्रिय मालिकेतील कलाकार जल्लोषात स्वागत करणार गणरायाचं

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. भक्तीमय वातावरणाने भारावून टाकणारे हे दहा दिवस वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा आणि नवचैतन्य देऊन जातात. लाडक्या बाप्पाचा हा उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार सज्ज आहे.

स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव 2023 या गणपती विशेष कार्यक्रमाची यंदाची थीम आहे आरती घराघरातली. ज्या आरत्या आपण मनोभावाने म्हणतो त्या आरत्या रचल्या कुणी आणि त्यामागची गोष्ट या कार्यक्रमातून दाखवण्यात येईल.

सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अविनाश-विश्वजीत यांनी या कार्यक्रमासाठी काही आरत्यांना नव्याने संगीतबद्ध केलं आहे. मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचे स्पर्धक आणि प्रवाह परिवारातल्या कलाकारांनी मिळून बाप्पाच्या आरत्या नव्या अंदाजात सादर केल्या आहेत.

या गणपती विशेष कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडलीये ‘मन धागा धागा जोडते नवा मालिकेतील सार्थक आणि अबोलीने गणरायाच्या या जल्लोषात निर्मिती सावंत आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्यातली धमाल जुगलबंदी कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवणार आहेत.

स्टार प्रवाह वाहिनीने मराठी परंपरा मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य प्रत्येक कार्यक्रमातून जपलं आहे. त्यामुळे स्टार प्रवाह गणेशोत्सव 2023 आरती घराघरातली हा कार्यक्रमदेखील पुन्हा एकदा मराठी परंपरेचं दर्शन घडवेल यात काही शंका नाही रविवारी 24 सप्टेंबरला सायंकाळी 7 वाजल्यापासून स्टार प्रवाह वाहिनीवर हा कार्यक्रम प्रसारित होईल.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments