Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज लॉजमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळः हिंजवडीत आयटी इंजिनिअर तरुणीची गोळ्या झाडून हत्या

लॉजमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळः हिंजवडीत आयटी इंजिनिअर तरुणीची गोळ्या झाडून हत्या

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

आयटी हब हिंजवडीत एका आयटी इंजिनिअर तरुणीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मृतदेह एका लॉजमध्ये सापडल्याने खळबळ उडालेली आहे. हत्या करणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रेम संबंधांतून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हिंजवडी पोलिस स्टेशन हद्दीतील महारुंजी भागातील सुपर ओयो टाऊन हाऊस इम्पेरियल या लॉजमध्ये तरुणीची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. वंदना द्विवेदी (वय २६) असे या तरुणीचे नाव असून ती मागील दोन दिवसापासून तिचा लखनौवरुन आलेला मित्र ऋषभ निगम याच्यासोबत वास्तव्यास होती.

आज सकाळी ऋषभ निगम याने वंदनाची बंदुकीने गोळी झाडून हत्या केली. हा हत्येनंतर तो लखनऊला जाण्यासाठी पळून गेला, मात्र मुंबई पोलिसांनी त्याला नाकाबंदी करत ताब्यात घेतले. तसेच हत्येत वापरण्यात आलेली पिस्टलही त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हिंजवडीत नक्की काय सुरू?

काही दिवसांपूर्वी हिंजवडीत पत्नीच्या प्रियकराची माहिती मिळाल्यावर पतीने प्रियकराची चाकुच्या साह्याने वार करत हत्या केल्याचा प्रकार पुण्यातील हिंजवडी येथे उघडकीस आला होता. या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. मृत व्यक्ती बेपत्ता असल्याने त्याचा शोध घेत असतांना या प्रकरणाचा उलगडा झाला. पत्नीसोबत किशोरचे प्रेमसंबंध असल्याचा संशय त्याला होता. यामुळे त्याने त्याला जीवे मारण्याचा कट रचला. किशोरला दुचाकीवरून सूसगाव येथून वारक गावात मुळशी धरणाच्या बाजूला नेले. या ठिकाणी त्याने लघुशंका करण्याच्या बहाण्याने थांबला. यावेळी सोबत आणलेल्या चाकूने किशोरच्या मानेवर, चेहऱ्यावर वार करून त्यांचा खून केला होता. यानंतर त्यानंतर किशोरचे हात-पाय बांधून त्याचा मृतदेह मुळशी धरणाच्या पाण्यात फेकून दिला होता.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments