Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज लॉजमधील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोघांना अटक, दिघी पोलिसांची कारवाई

लॉजमधील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोघांना अटक, दिघी पोलिसांची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी : लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. यात महिलेला पैशांचे आमिष दाखवून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतल्याचे समोर आले. याप्रकरणी दिघीपोलिसांनी दोघांना अटक केली. साईनगरी येथील अगत्य लॉज येथे बुधवारी (दि. २९) रात्री ही कारवाई केली.

अजय रमेश रणदिवे (२५, रा. वडमुखवाडी), अजय दत्ता हरणे (२५, रा. सावरी, ता. निलंगा, लातूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह संजय पवळे (रा. चऱ्होली) याच्या विरोधात देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिस अंमलदार सोमनाथ खडसाळे यांनी गुरुवारी (दि. ३०) दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणदिवे आणि हरणे या दोघांनी एका महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला. त्यातून मिळालेल्या पैशांवर दोघांनी आपली उपजीविका भागवली. याप्रकरणी माहिती मिळाली असता पोलिसांनी अगत्य लॉजवर छापा मारून कारवाई केली. यामध्ये एका महिलेची वेश्या व्यवसायातून सुटका करत दोघांना अटक केली. तसेच आठ हजार ९४० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments