इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबई येथील लीलावती रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.लीलावती रुग्णालयाच्या चॅरिटेबल ट्रस्टने माजी विश्वस्तांविरुद्ध एक धक्कादायक आरोप केला आहे. लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टने आरोप करत सांगितले आहे कि, माजी विश्वस्तांनी आणि इतर व्यक्तींनी जवळजवळ 1,500 कोटी रुपयांचा गैरवापर केला आहे. इतकेच नसून माजी विश्वस्त आणि संबंधित व्यक्तींनी रुग्णालयाच्या आवारात काळी जादू केल्याचा आरोप लीलावती रुग्णालयाच्या चॅरिटेबल ट्रस्टने केला आहे. रुग्णालयाच्या चॅरिटेबल ट्रस्टने केलेल्या आरोपानुसार, फॉरेन्सिक ऑडिटमध्ये तब्बल 1,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा मोठा आर्थिक गैरव्यवहाराचा उघड झाला आहे. वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या आदेशामुळे चॅरिटेबल ट्रस्टने एफआयआर केली असून माजी विश्वस्त आणि इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध तीनपेक्षा जास्त एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. लीलावती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक परमबीर सिंह यांनी 11 मार्च रोजी याबाबत पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये हा संपूर्ण प्रकार सांगण्यात आला आहे.
लीलावती रुग्णालयाचे सध्याचे विश्वस्त प्रशांत मेहता यांच्या कार्यालयाच्या जमिनीखाली हाडे आणि मानवी केसांनी भरलेले आठ कलश पुरलेले आढळल्याचे त्यांनी सांगितले. काही माजी कर्मचाऱ्यांनी डिसेंबर 2024 मध्ये हि धक्कादायक माहिती मला सांगितली असे प्रशांत मेहता यांनी सांगितले. दरम्यान, संशयीत माजी विश्वस्तांनी नरबळी देऊन काळी जादू केली होती.
एलकेएमएमटीचे स्थायी निवासी विश्वस्त प्रशांत मेहता यांनी संशयीत आरोपी विरुद्ध तपास सुरु असल्याचे सांगितले आहे. वांद्रे पोलिस ठाण्यात हि तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, या गंभीर आरोपांनंतरही, वांद्रे पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिला. म्हणून, आम्ही न्यायालयात धाव घेतली.
दरम्यान, एफआयआर नोंदवल्यानंतर, पुढील तपासासाठी हा खटला आर्थिक गुन्हे शाखेकडे (ईओडब्ल्यू) सोपवण्यात आला आहे. रुग्णालयात झालेल्या गैरव्यवहारामुळे ट्रस्टच्या कामकाजावर आणि मुंबईतील उच्चभ्रू वांद्रे परिसरातील लीलावती रुग्णालयाद्वारे प्रदान केलेल्या आरोग्य सेवांवर नकारात्मक परिणाम झाल्याचे चॅरिटेबल ट्रस्टने म्हंटले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा सुरु असून अधिकारी कसून चौकशी करत आहेत.