Saturday, May 24, 2025
Homeक्राईम न्यूजलाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होण्यास विलंब ; कारण काय?

लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होण्यास विलंब ; कारण काय?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : राज्यात महायुती सरकार पुन्हा सत्तेत आणण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. या योजनेतून पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्यात येतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून योजनेचा हप्ता हा ठराविक तारखेला न मिळता उशिरा मिळत आहे. यावर आता मंत्री तटकरे यांनी स्पष्टीकरण दिल आहे. आम्ही सातत्याने या समस्या सोडवण्यासाठी काम करत आहोत. कागदपत्रे तपासणी किंवा आधार लिंकिंगच्या संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी एक टीम कार्यरत आहेत. त्यामुळे लवकरच पैसे जमा होतील असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान याआधीही मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेत कोणताही बदल करण्यात आले नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने योजना बंद होणार असल्याचा प्रचार सातत्याने विरोधकांच्याकडून करण्यात येत होता. आता या योजनेतून मिळणाऱ्या एप्रिलच्या हप्त्याकडे लाडक्या बहिणीचे लक्ष लागल आहे. आतापर्यंत एकूण 9 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आले आहेत. आता एप्रिल महिन्याचा म्हणजेच 10वा हप्ता अक्षय तृतीयेला मिळणार असल्याच समोर आले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलालाभासाठी पात्र आहेत. 2 लाख 50 हजार रुपये पेक्षा उत्पन्न असणाऱ्या महिला लाभासाठी पात्र आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments