इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबई : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतील फेब्रुवारीचा हप्ता वेळेआधी मिळणार आहे. लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता उद्यापासून (दि. 21) दिला जाणार आहे. यासाठी वित्त विभागाकडून 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता हप्त्याची वाट बघावी लागणार नाही. हे स्पष्ट झाले आहे.
अनेक बहिणी अपात्र ठरणार?
लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता खात्यावर कधी जमा होणार? याबाबत चर्चा रंगू लागली होती. मात्र, आता उद्यापासूनच लाडकी बहिण योजनेचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. डिसेंबर अखेर महिला लाभार्थ्यांची संख्या 2 कोटी 46 लाख इतकी होती. त्यातील ५ लाख महिला अपात्र झाल्यानंतर जानेवारी अखेर 2 कोटी 41 लाख लाभार्थी महिला राहिल्या होत्या. मात्र, अद्याप फेब्रुवारी अखेरची आकडेवारी समोर आलेली नाही. आता मात्र त्यातही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लाडकी बहीण योजना..
राज्य सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या आधी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजाराचा लाभ दिला जातो. 21-65 वयोगटातील ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. त्यांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होतात.