इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : राज्यात महायुती सरकार सत्तेत आणण्यात मोलाचा वाटा ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बाद होईल असं विधान विरोधकांकडून वारंवार केले जातय. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात सरकारकडून दरमहा 1500 रुपये देण्यात आले आहेत. सत्तेत आल्यानंतर या योजनेतून 2100 रुपये देण्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं होतं मात्र आता महायुतीच्या महत्त्वाच्या नेत्यांच्याकडूनही 2100 रुपये मिळणार नसल्याबाबत विधान केलं जातय. त्यानंतर आता शिवसेना नेत्या नीलम गो-हे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे लाडक्या बहिणीच्या पदरी निराशा आली आहे.
लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यावरून उपसभापती नीलम गो-हे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. याबाबत त्या म्हणाल्या, राज्य सरकारला आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणे शक्य नाही जेव्हा सरकारला शक्य होईल तेव्हा सरकार लाडक्या बहिणींना दीड हजारावरून 2100 रुपये देईलं असं त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे.
या योजनेवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही सरकारवर निशाणा साधला. लाडकी बहिण योजना, कर्जमाफी आणि इतर योजनांच्या घोषणांमुळे महायुती सरकार सत्तेत आलं. मात्र सत्तेत आल्यानंतर या योजना सुरू ठेवणं, सरकारला आता जड जातंय… महिलांना एकीकडे 2100 रुपयांची आस आहे, मात्र 1500 देणंच सरकारला मुश्किल झालंय. त्यामुळे योजनाच बंद होईल असं राज ठाकरेंनी म्हंटल आहे.