इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : राज्यात महायुती सरकार पुन्हा सत्तेत आणण्यात गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आता मोठे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सध्या या योजनेतुन बहिणीनीं भरलेल्या अर्जाची आता राज्यातील विविध जिल्ह्यात छाननी प्रक्रिया पार पडत आहे. या छाननी प्रक्रियेनंतर आता धक्कादायक माहिती समोर आली असून तब्बल दोन लाख अर्ज बाद ठरले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार पात्र व अपात्र असलेल्या लाभार्थ्यांची पडताळणी करताना पहिल्यांदा पाच लाख महिला अपात्र ठरल्या होत्या. आता त्यानंतर तब्बल दोन लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.. या अपात्र लाभार्थीमध्ये 65 वर्षे पूर्ण केलेल्या महिलांसह चार चाकी गाड्या असलेल्या, टॅक्स भरणा करणाऱ्या महिला तसेच जमीन असणाऱ्या महिलांचे अर्ज या योजनेतून अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे लाडक्या बहिणींचं टेन्शन आणखीनच वाढला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आधी जुलै 2024 मध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेसाठी काही निकषही ठरवण्यात आले होते मात्र सरकारी यंत्रणांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येऊन सुरुवातीच्या काळात सरसकट अर्ज मंजूर करण्यात आले होते. त्यामुळे लाभार्थ्यांच्या संख्यात मोठी वाढ झाली होती. इतर लाभार्थ्यांना दर महिन्याला दीड हजार रुपये देताना सरकारची तिजोरी कमी होऊ लागली. यानंतर आता निकषांनुसार अर्जाचीं पडताळणी करण्यात येत असून अर्ज बाद करण्यात येत आहेत. त्यामुळे सरकारच्या ही संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान येत्या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे लाडक्या बहिणीचे लक्ष लागले आहे.