Tuesday, September 10, 2024
Homeक्राईम न्यूज'लाडकी बहीण 'साठी अर्ज करताना त्रुटी आल्यास फेरअर्ज करावा; उपमुख्य कार्यकारी अधिकारी...

‘लाडकी बहीण ‘साठी अर्ज करताना त्रुटी आल्यास फेरअर्ज करावा; उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आवाहन

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अनुषंगाने लाभार्थी महिलांच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण होत आहेत. तर, ज्यांनी अर्ज सादर केले आहेत, त्यामध्ये त्रुटी असल्याचे समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर संबंधित लाभार्थ्यांनी संकेतस्थळावर जाऊन फेरअर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण जामसिंग गिरासे यांनी केले आहे.

विशेषतः अर्ज मंजूर झाल्यानंतरही बँक खात्यात पैसे जमा न झालेल्या महिलांनी बँक खात्यासोबत आधारकार्ड संलग्न करून घ्यावे. नारीशक्ती अॅप किंवा माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावर अर्ज भरलेल्या महिलांनी आपले आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न असल्याची खात्री करावी. ही प्रकिया पूर्ण केल्यानंतरच योजनेचा लाभ मिळणार आहे.

अर्जाची सद्यःस्थिती ‘डिसॲप्रूव्हड’ अशी दिसत असल्यास आपल्या भ्रमणध्वनीद्वारे नारीशक्ती अॅपवर किंवा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावरून लॉगिन करून एडिट या ऑप्शनवरून कागदपत्रांची त्रुटी दूर करून अर्ज पुन्हा अपलोड करावे. ज्या महिलांनी अंगणवाडी सेविका अथवा सेतू सुविधा केंद्रातून अर्ज भरला असेल, त्यांनीदेखील त्यांच्या खात्यावरून अर्ज एडिट करून त्रुटी दूर करावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments