Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजलाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट ! "या" तारखेला जमा होणार एप्रिलचा हप्ता

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट ! “या” तारखेला जमा होणार एप्रिलचा हप्ता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही गेमचेंजर ठरली. जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेचे 9 हफ्ते आत्तापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर एप्रिल महिन्याचे पैसे कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणीचे लक्ष लागले असताना या संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने एप्रिल महिन्याचा हप्ता 30 तारखेला महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

महायुतीची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काही ना काही कारणांमुळे सतत चर्चेत असते. त्या अंतर्गत पात्र ठरलेल्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी ही योजना गेमचेंजर ठरली, पण विरोधकांच्या निशाण्यावरही ही योजना खूप आली. एप्रिलचा हप्ता कधी येणार याकडे लाडक्या बहिणीचे लक्ष लागले असताना यापूर्वी राज्य सरकारच्या निर्णयानुसार योजनेचा हफ्ता प्रत्येक महिण्याच्या 8 तारखेला होणार असे सांगितलं गेले होते मात्र एप्रिलचा हफ्ता 30 तारखेला मिळणार आहे.

दरम्यान ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अपात्र अर्जाची पडताळणी केली जाईल, असे राज्य सरकारकडून जानेवारीत जाहीर करण्यात आले होते. परंतु पडताळणीनंतर लाडक्या बहिणींची संख्या कमी होण्याऐवजी जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी आणि मार्चच्या लाभार्थीची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीच्या अर्जाची पडताळणी आता ठप्प झाल्याचे दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments