Thursday, March 20, 2025
Homeक्राईम न्यूज'लाडकी बहिण 'चा अर्ज भरलेल्यांना १ कोटी ९२ लाखांचा प्रोत्साहन भत्ता

‘लाडकी बहिण ‘चा अर्ज भरलेल्यांना १ कोटी ९२ लाखांचा प्रोत्साहन भत्ता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरलेल्या अंगणवाडी सेविकांसह इतरांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील १ कोटी ९२ लाख २५ हजार ६०० रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. पैसे आले असले तरी, एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे हस्तांतरित करून ते प्रत्यक्षात अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर पैसे जमा करण्यास एका आठवड्याचा कालावधी गेला आहे. पुढील काही दिवसांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर एका अर्जासाठी पन्नास रुपयांप्रमाणे पैसे वर्ग करण्यात येणार आहेत.

पुणे शहरासह जिल्ह्यातून सर्वाधिक लाडक्या बहिणींनी अर्ज केले. त्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस, अंगणवाडी पर्यवेक्षिका, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे (एनयूएलएम) समूह संघटक, मदत कक्षप्रमुख, शहर मिशन मॅनेजर, ग्रामसेवक, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्रांच्या माध्यमातून आठ लाख ८८ हजार ९४२ लाडक्या बहिणींचे अर्ज भरण्यात आले होते. सरकारने प्रत्येक अर्जासाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून पन्नास रुपये देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार प्रशासनाकडून राज्याला निधीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार राज्याकडून निधी पाठविण्यात आला. त्याला जवळपास एक आठवड्याचा कालावधी झाला तरीदेखील तो अद्याप अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर जमा झालेला नाही.

ग्रामीण भागात अर्ज भरताना अंगणवाडी सेविकांना अर्ज करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. अनेकदा ऑफलाईन माहिती घेऊन रात्री उशिरा किंवा पहाटे ऑनलाईन माहिती भरण्याचे काम सेविकांनी केले. लाडक्या बहिणींना ऑगस्टपासून लाभवाटप सुरू करण्यात आला असून, अंगणवाडी सेविकांना कामाचे पैसे मिळण्यास सात महिने लागले असल्याची खंत काही सेविका व्यक्त करत आहेत. याबाबत जिल्हा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे म्हणाले, जिल्हा महिला व बालकल्याण विभागाकडे निधी आलेला आहे. त्यांच्याकडून निधी प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. एक-दोन दिवसांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments