इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः आंबेगाव येथील शिवसृष्टी प्रकल्प परिसरातील शिवसृष्टीच्या बोर्डवर एका वयस्कर व्यक्तीने लघुशंका केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच शिवभक्तांमधून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. अमोल कुलकर्णी असे त्या वयस्कर व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून तपास सुरू आहे.
स्थानिक नागरिक आणि शिवसृष्टीच्या समर्थकांकडून या लज्जास्पद कृत्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. स्थानिकांनी अमोल कुलकर्णी याला पकडून भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. सदर लज्जास्पद घटनेमुळे शिवसृष्टीच्या पावित्र्याला धक्का लागल्याची भावना शिवभक्तांमधून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी शिवभक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अश्या लज्जास्पद कृत्यांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची करावी अशी मागणी शिवभक्तांकडून करण्यात येत आहे. आरोपी कुलकर्णी हा मतिमंद असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
आरोपी कुलकर्णी याला मराठा समाजाने काळे फासून निषेध व्यक्त केला आहे. भारती विद्यापीठ पोलीसांकडून सदर घटनेचा तपास करण्यात येत आहे.