Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजलष्कर ठाण्यात 6 आरोपींवर गुन्हा दाखलः तरुणीने बलात्काराची तक्रार मागे न...

लष्कर ठाण्यात 6 आरोपींवर गुन्हा दाखलः तरुणीने बलात्काराची तक्रार मागे न घेतल्याने तरुणीसह कुटुंबीयांना बेदम मारहाण

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

तरुणीने बलात्काराची तक्रार मागे न घेतल्याने तरुणीच्या घरात बळजबरीने शिरून टोळक्याने तिचा भाऊ, बहिणीला चाकुचा धाक दाखवून मारहाण केल्याची घटना लष्कर भागात घडली. तरुणीसह तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींवर गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी अलसबा जावेद शेख, जावेद शेख, आयान शेख, सलीम शेख, अल्फेज शेख यांच्यासह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी अलसबा शेखच्या भावाविरुद्ध तरुणीने बलात्कार केल्याप्रकरणी तक्रार दिली होती. तरुणीने तक्रार मागे न घेतल्याने आरोपी तरुणीवर चिडले होते. त्यानंतर आरोपी शेख तरुणीच्या घरात शिरले. तिची लहान बहीण, दोन भावांना जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी तरुणीच्या लहान बहिणीवर चाकू उगारून तिला धमकावले. बलात्काराची तक्रार मागे न घेतल्यास संपूर्ण कुटुंबाला जीवे मारू, अशी धमकी आरोपींनी दिली. घाबरलेल्या तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक मनीषा वलसे तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments