Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजलष्करात नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्यास बेड्याः कोंढवा पोलीस आणि मिलेटरी इंटेलिजन्सची...

लष्करात नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्यास बेड्याः कोंढवा पोलीस आणि मिलेटरी इंटेलिजन्सची संयुक्त कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

कमांड हॉस्पिटल आणि लष्करात विविध पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या सेवानिवृत्त अकॉउंटला कोंढवा पोलीस आणि मिलिटरी इंटेलिजन्सची संयुक्त कारवाई करत बेड्या ठोकल्या आहे. विनायक तुकाराम कडाळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

कडाळे ने कमांड हॉस्पिटल येथून अकॉउंट (सिव्हिल सर्व्हिस) मधून स्वेइच्छा सेवानिवृत्ती घेतली आहे. कडाळे याने कमांड हॉस्पिटल आणि लष्करात विविध पदावरून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फिर्यादी व त्यांच्या परिचयाच्या लोकांना, नातेवाईकांकडून १३ लाख ५० हजार घेत फसवणूक केल्या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा केल्यानंतर कडाळे हा नेहमी राहण्याचा पत्ता बदलून दुसऱ्या ठिकाणी राहायला गेला होता.

कडाळे हा लुल्लानगर येथील सपना पावभाजी जवळील सोसायटीत राहत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस अंमलदार विकास मरगळे, रोहित पाटील आणि सर्दन कमांड मिलेटरी इंटेलिजन्स यांना मिळाली होती. कडाळे हा वेषांतर करून फिरत असल्याचे तपासात समोर आले होते. कोंढवा पोलीस आणि मिलेटरी इंटेलिजन्सची संयुक्त कारवाई करत विनायक कडाळे याला अटक केली आहे. कडाळे याने अजून काही बेरोजगार तरुणांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बाबर करत आहेत.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, दिनेश पाटील, पोलिस अंमलदार अमोल हिरवे, राहुल वंजारी, अभिजीत रत्नपारखी, जयदेव भोसले, विकास मरगळे, राहुल थोरात, सुहास मोरे, अभिजीत जाधव, आशिष गरुड, रोहित पाटील, अक्षय शेंडगे, शशांक खाडे यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments