Sunday, December 10, 2023
Home क्राईम न्यूज लवकरच एकाच तिकिटात पीएमपी अन् मेट्रोतून प्रवास; चंद्रकांत पाटील यांचे सूतोवाच

लवकरच एकाच तिकिटात पीएमपी अन् मेट्रोतून प्रवास; चंद्रकांत पाटील यांचे सूतोवाच

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे: डिजिटल व्यवहार वाढले पाहिजेत, अशी पंतप्रधान मोदी यांची इच्छा आहे. जगात सगळ्यात जास्त डिजिटल व्यवहार आज भारतात होत आहेत. परंतु, पीएमपीएल या डिजिटल व्यवहारात मागे आहे. त्यामुळे पीएमपी आणि मेट्रो यांची तिकीट यंत्रणा एकत्र करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी व्यक्त केले.

‘डिजिटल इंडिया’ या उपक्रमांतर्गत पीएमपीएमएलमध्ये रविवारपासून क्यूआर कोड म्हणजेच गुगल पे तिकीट यंत्रणा सुरू केली आहे. या सेवेचा शुभारंभ कोथरूड येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

यावेळी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रतापसिंह, सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार पवार, माजी नगरसेवक गणेश वरपे, नवनाथ जाधव, अजय मारणे, किरण दगडे-पाटील, अल्पना वरपे, नितीन शिंदे, वैभव मुरकुटे, मंदार जोशी इ. उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘पीएमपीएलची यंत्रणा इतकी सक्षम व्हावी की लोकांना खासगी वाहनाचा वापरच करावा लागू नये. घरापासून पीएमपीएलने मेट्रो स्टेशन, तिथून मेट्रोने कार्यालय अन् पुन्हा पीएमपीएलने घरी, अशी व्यवस्था झाली तरच खासगी वाहनांचा वापर कमी होईल.’

कर्मचारी समाधानी राहिले तरच संस्था सक्षम राहते. त्यामुळे पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी हे सरकार प्रयत्न करत आहे. यातून एक चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी राहील, असा विश्वासही पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी सचिन्द्र प्रतापसिंह म्हणाले की, ‘गेल्या तीन महिन्यापासून पीएमपीएमएल नागरिकांना चांगली सुविधा देण्यासाठी बरेच प्रयत्न करीत आहे. या कार्यक्रमाचे पीएमपीएमएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार पवार यांनी प्रास्ताविक केले.

गुगल सांगणार बसची वेळ

तुमची बस स्थानकावर नेमकी किती वाजता येणार आहे, याची माहिती मिळण्यासाठी पीएमपीएल गुगल अॅप तयार करत आहे. त्यावर बसची नेमकी वेळ कळेल. त्यामुळे स्थानकावर विनाकारण गर्दी कमी होईल आणि नागरिकांसाठी प्रवास सुलभ होईल. अशी सुविधा येत्या काळात लवकरच सुरू कण्याचा पीएमपीचा मानस आहे.

RELATED ARTICLES

प्रवासात गहाळ झालेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने परत; पोलिसांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) नालासोपारा: मुंबईतून वसईत ओला कॅबने प्रवास करत असताना गहाळ झालेले ८० हजारांची रोख रक्कम व ५ लाख रुपये किंमतीचे...

देहू-आळंदी रस्त्यावर ट्रकच्या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) चिखली (पुणे) : देहू-आळंदी रस्त्यावरील मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या तळवडे चौकात दुपारी एका गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकने...

ई-चालान भरा; नाहीतर लोकअदालतमध्ये हजर व्हा! १७ लाख वाहनचालकांना नोटीस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकूण १७ लाख १०...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

प्रवासात गहाळ झालेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने परत; पोलिसांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) नालासोपारा: मुंबईतून वसईत ओला कॅबने प्रवास करत असताना गहाळ झालेले ८० हजारांची रोख रक्कम व ५ लाख रुपये किंमतीचे...

देहू-आळंदी रस्त्यावर ट्रकच्या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) चिखली (पुणे) : देहू-आळंदी रस्त्यावरील मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या तळवडे चौकात दुपारी एका गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकने...

ई-चालान भरा; नाहीतर लोकअदालतमध्ये हजर व्हा! १७ लाख वाहनचालकांना नोटीस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकूण १७ लाख १०...

स्पार्कल कँडल’ कारखाना स्फोट प्रकरणी २ महिलांसह चौघांवर गुन्हा; एकाला अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : 'स्पार्कल कँडल' बनविणाऱ्या कारखान्यात स्फोट झाल्याप्रकरणी जागा मालक, कारखाना चालक तसेच दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला....

Recent Comments