Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज ललित पाटील प्रकरणी दोन डॉक्टर कारागृहात; 'ससून'चे देवकाते, कारागृहाचे मर्साळेवर कारवाई

ललित पाटील प्रकरणी दोन डॉक्टर कारागृहात; ‘ससून’चे देवकाते, कारागृहाचे मर्साळेवर कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणात ससून येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण दादासाहेब देवकाते आणि येरवडा कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मर्साळे या दोघांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

डॉ. प्रवीण दादासाहेब देवकाते (वय ४०) आणि डॉ. संजय मर्साळे या दोघांना अटक केली होती. गुरुवारी (दि.७) त्यांची पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी या दोघांना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. सी. बिराजदार यांच्या न्यायालयाने ती मान्य केली.

डॉ. प्रवीण देवकाते हा अस्थिरोगतज्ज्ञ असून, ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १६ ची जबाबदारी त्याच्यावर होती. ललित पाटील याला ऑर्थोपेडिक्स संदर्भात कोणताही आजार नसताना, त्याने दोन ते तीन महिने त्याचा मुक्काम ससून रुग्णालयात वाढविला. पाटील याचा भाऊ भूषण पाटील व मित्र अभिषेक बलकवडे यांच्या संपर्कातदेखील तो असल्याचे पोलिस चौकशीत निष्पन्न झाले. त्याचप्रमाणे ससून रुग्णालयातील एका मध्यस्थाच्या फोनवरून डॉ. देवकाते याने पाटील याच्या नातेवाइकांशी वारंवार संपर्क केल्याचा पुरावा पोलिसांना मिळून आला आहे.

येरवडा कारागृहातील डॉ. संजय मर्साळे याने ललित पाटील हा आजारी असल्याचे सांगून त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी शिफारस पत्र दिल्याचे आणि पाटील याचा भाऊ भूषण पाटील व मित्र अभिषेक बलकवडे यांच्या संपर्कात असल्याचे दिसून आले आहे.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments