Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज ललित पाटीलप्रकरणी संजीव ठाकुरांची चौकशी; अटकेची टांगती तलवार

ललित पाटीलप्रकरणी संजीव ठाकुरांची चौकशी; अटकेची टांगती तलवार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : ड्रग्जमाफिया ललित पाटीलला ससून रुग्णालयात वैद्यकीय उपचारांच्या नावाखाली अनेक महिने बडदास्त ठेवून आश्रय दिल्याप्रकरणी ससून रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांची पुण्याच्या गुन्हे शाखेने तीन वेळा चौकशी केली आहे. चौकशीदरम्यान ललित पाटीलला जास्त दिवस रुग्णालयात राहण्यास मदत केल्याप्रकरणी त्यांचा सहभागही निष्पन्न झाला आहे. यामध्ये डॉ. ठाकूर हे सुपर क्लास वन अधिकारी असल्याने यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक व दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे गुन्हे शाखेने प्रस्ताव पाठवला आहे. हा प्रस्ताव मंजूर होताच डॉ. ठाकूर यांच्यावर कारवाई होणार असल्याने डॉ. ठाकूर यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

ड्रग्जमाफिया ललित पाटील याला ४ जून २०२३ रोजी टीबीच्या शक्यतेने उपचारासाठी ससून रुग्णालयातील श्वसनरोग विभागाच्या अंतर्गत कैद्यांचा वॉर्ड नंबर १६ मध्ये दाखल करण्यात आले होते. टीबी नसल्याने त्याला पाठीच्या दुखण्यासाठी अस्थिरोग विभागात तीन महिने उपचार सुरू होते. त्यानंतर डॉ. ठाकूर यांनी त्यांच्या शल्यचिकित्सा (सर्जरी) युनिटमध्ये हर्नियाच्या उपचारासाठी महिनाभर दाखल केले होते.

या दरम्यान अमली पदार्थविरोधी पथकाने ससूनच्या गेटजवळ दोन कोटी १४ लाख रुपयांचे मेफेड्रॉन हे ड्रग्ज कारवाई करून पकडले. हे ड्रग्ज रॅकेट ससूनमध्ये उपचार घेत असलेला कैदी ललित पाटील चालवत असल्याचे पोलिसांच्या तपासात आढळले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाटील पळूनही गेला होता. त्यावरून पोलिस प्रशासनाने ललित पाटील याच्या बंदोबस्तावरील १२ पोलिसांना निलंबित, तर चौघांना सेवेतून बडतर्फ केले. दरम्यान, ललित पाटील याच्यावर ड्रग्जप्रकरणी व पळून गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

यानंतर खरे तर पाठीचे दुखणे, हर्निया याच्या उपचारासाठी ललित पाटील चार महिने कसे काय ठेवले गेले, हा प्रश्न उपस्थित झाला. तसेच या मुक्कामासाठी ललित पाटीलने मोठ्या प्रमाणात बंदोबस्तावरील पोलिस आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांसोबत आर्थिक व्यवहार केल्याची चर्चा झाली. या आधी या प्रकरणात ललितला पळून जाण्यासाठी मदत केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील शिपाई महेंद्र शेवते आणि अस्थिरोग विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रवीण देवकाते यांना अटक झाली होती.

त्यांच्या व इतर आरोपींच्या चौकशीतून आणि पोलिसांच्या तपासातून या प्रकरणाचे धागेदोरे थेट डॉ. ठाकूर यांच्यापर्यंत पोहोचल्याने गुन्हे शाखेने डॉ. ठाकूर यांची तीन वेळा चौकशी केली आणि त्या चौकशीत त्यांचा ललित पाटील याला अधिक काळ आश्रय दिल्याप्रकरणी सबळ पुरावे आढळून आले. तसा त्यांचा याबाबत जबाबही नोंदवून घेण्यात आला आहे. मात्र, कोणत्याही क्लास वन अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी त्या विभागाच्या सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी लागते. त्यानुसार वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव हे सक्षम प्राधिकारी आहेत. त्यांच्याकडे गुन्हे शाखेने डॉ. ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी व दोषारोपपत्र सादर करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम १९७ नुसार ५ जानेवारीला पोलिसांनी परवानगी मागितली आहे. ही परवानगी मिळाल्यास डॉ. ठाकूर यांच्यावर पुढील कारवाई होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली.

काय आहे कलम १९७

एखादा लोकसेवक अथवा शासकीय कर्मचारी जर स्वतः गुन्हा करत असेल तर त्या प्रकरणी त्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना राज्य शासनाची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. याबाबतची तरतूद फौजदारी प्रक्रिया संहिता-१९७३ (द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर) च्या कलम १९७ नुसार करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments