Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचा बँक बॅलेन्स प्रॉपर्टी बाबतचा तपास करणार

ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचा बँक बॅलेन्स प्रॉपर्टी बाबतचा तपास करणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालविणारा अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या भूषण पाटील, हरीश पंत, अरविंदकुमार लोहारे आणि इब्राहम शेख यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. पंत, लोहारे आणि शेख यांचे बँक डिटेल्स पोलिसांना मिळाले आहेत. त्यांच्या बँक बॅलन्ससह प्रॉपर्टी बाबतचा तपास करायचा आहे. त्यामुळे पोलिस कोठडीची गरज नसल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. त्यामुळे त्यांची पोलिस कोठडी राखून ठेवत तिघांसह भूषण पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

अमली पदार्थ तस्करी प्रकरणाचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. या गुन्हयात भूषण पाटील, हरीश पंत, अरविंदकुमार लोहारे आणि इब्राहम शेख हे चौघे पोलिस कोठडीत होते. त्यांची कोठडी बुधवारी संपल्याने त्यांना दुपारी विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.

हरीश पंत, अरविंदकुमार लोहारे, इब्राहम शेख यांच्या ‘सीडीआर’ (कॉल डिटेल्स) मधून महत्वाची माहिती मिळाली आहे. मात्र, ते तपासाला सहकार्य करत नाहीत. या तिघांचे बँक ‘डिटेल्स’ मिळाले आहेत. त्याचाही तपास बाकी आहे. तसेच, इब्राहम शेख हा नागपूर येथील अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात फरार होता, त्याचाही तपास करणे बाकी आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते. मात्र बुधवारी या चौघांसाठी पोलिस कोठडीची मागणी न करता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments