Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज ललितप्रकरणी पोलिस अॅक्शन मोडवर; 'ट्रीटमेंट' करणाऱ्या डॉक्टर आणि स्टाफची चौकशी

ललितप्रकरणी पोलिस अॅक्शन मोडवर; ‘ट्रीटमेंट’ करणाऱ्या डॉक्टर आणि स्टाफची चौकशी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : ससून रुग्णालयातील ड्रग्ज रॅकेट प्रकरणात फरार ललित पाटील याला अटक केल्यावर पुणे पोलिस अॅक्शन मोडवर आले आहेत. ललित पाटीलवर उपचार करणारे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या पथकातील वरिष्ठ डॉक्टर, लेक्चरर, एक्स-रे तंत्रज्ञ आदींची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ‘ससून’मध्ये मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल असताना ड्रग्ज तस्करीचे रॅकेट चालवणारा ललित पाटील हा पळून गेला आणि सर्व कारनामे एक एक करून पुढे येऊ लागले. हे प्रकरण राज्यभर गाजले. अखेर यंत्रणेलाही गंभीर दखल घ्यावी लागली. याबाबत ‘लोकमत’ने केलेला पाठपुरावा महत्त्वपूर्ण ठरला. विशेष म्हणजे, पोलिसांनी दिवाळीच्या आधीपासूनच गुप्तपणे या सर्वांची चौकशी सुरू केली आहे. ललितच्या चौकशीमधून जे काही तपशील समोर येतील, त्यानुसार कार्यवाही सुरू केली आहे. विशेष म्हणजे, याबाबत प्रचंड गुप्तता बाळगण्यात येत आहे. ज्यांना चौकशीसाठी बोलावले जात आहे, त्यांच्याकडून लेखी जबाब लिहून घेतले जात आहेत.

चौकशीसाठी तीन विभाग

• ललितवर उपचार सुरू असताना त्याच्यावर मेफेड्रॉनप्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यामुळे अमली पदार्थविरोधी पथक चौकशी करीत आहे. त्याअनुषंगाने ससून रुग्णालयातही चौकशी केली जात आहे.

– ललित पळून गेल्याप्रकरणी गुन्हे शाखा तपास करीत आहे. तसेच, ललितवर मोक्का लागल्याने त्याचा तपास सहायक आयुक्त सुनील तांबे करीत आहेत.

कारागृह प्रशासनाकडूनही ससून रुग्णालयामधील ललित पाटील प्रकरणाचे रेकॉर्ड मागितले जात आहेत.

ससून आणि कारागृह प्रशासन आमने-सामने :

ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी ललित पाटील याला उपचारासाठी ससून रुग्णालयात ठेवा, असे पत्र दिल्याचे काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते, तर ललित पाटील याला उपचारांसाठी तुमच्याकडेच राहू द्या, असे पत्र कारागृह प्रशासनाने ‘ससून’ला दिले होते, असे पत्र आता व्हायरल झाले आहे. यावरून ससून रुग्णालय आणि येरवडा कारागृह प्रशासनात शीतयुद्ध सुरू झाले असून, ते आता चव्हाट्यावर आले आहे.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments