Wednesday, November 29, 2023
Home क्राईम न्यूज लग्नाला काहीच दिवस राहिलेले पण तरुणाला मृत्यूनं कवटाळलं, त्या रात्रीमुळं सारं गाव...

लग्नाला काहीच दिवस राहिलेले पण तरुणाला मृत्यूनं कवटाळलं, त्या रात्रीमुळं सारं गाव हळहळलं

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी : जमिनीवर लटकलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चिखलीतील कुदळवाडीत रविवारी ( एक ऑक्टोबर) सकाळी घडली.

शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसात सेक्टर १६ ते चिखली मार्गावरील विद्युत खांबावरील कनेक्टर स्लीप होऊन तार खाली आली. तारेतील विद्युत प्रवाह सुरू होता. तार तरुणाला न दिसल्याने तिला स्पर्श होताच तो जागीच कोसळला. नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिस प्रशासनाने संबंधित घटनेची माहिती ‘महावितरण’ला देऊन वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर रुग्णवाहिकेतून तरुणाला ‘वायसीएम’मध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच तरुणाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. महंमद असीम चौधरी (वय २३) असे मृताचे नाव आहे.

चिखली कुदळवाडी, जाधववाडी भाग महापालिकेत येऊन २० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. मात्र, अद्याप कुदळवाडीत मूलभूत सुविधा पुरविण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. कुदळवाडीतील मोरे पाटील चौक ते जाधववाडीकडे जाणारा मार्ग आणि सेक्टर १६ ते चिखली मार्गावरील विद्युतवाहिनी; तसेच कुदळवाडीतील अंतर्गत भागातील विद्युतवाहिन्या भूमिगत करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, ‘महावितरण’चे अधिकारी विविध कारणे देऊन काम पुढे ढकलत आहेत.

नोव्हेंबरमध्ये होते महंमदचे लग्न

महंमदचा भंगाराचा व्यवसाय आहे. मूळचे उत्तर प्रदेशातील चौधरी कुटुंब व्यवसायानिमित्त चिखली कुदळवाडी येथे स्थायिक झाले आहे. नोव्हेंबरमध्ये त्याचे लग्न ठरले होते. मात्र, लग्नाआधीच त्याला मृत्यूने कवटाळल्याने कुदळवाडी परिसरातील नागरिक हळहळ करीत आहेत. त्याचा मृतदेह अंत्यविधीसाठी उत्तर प्रदेशला पाठविण्यात आला आहे.

वारंवार तुटतात तारा

मागील काही वर्षांपासून सातत्याने भैरवनाथ मंदिराच्यासमोर, सागर हॉटेल आणि आयुष मेडिकलच्या समोरील विद्युत खांबांवरील तारा वारंवार तुटत आहेत. अशावेळी ‘महावितरण’ तात्पुरती मलमपट्टी करत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ‘महावितरण’च्या या बेजबाबदार कारभारामुळे तरुणाला जीव गमवावा लागला आहे.

वाहिन्या भूमिगत करण्याची मागणी

कुदळवाडीतील सर्वच भागांतील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याची मागणी माजी स्वीकृत सदस्य दिनेश यादव आणि सामाजिक कार्यकर्ते रोहित जगताप यांनी केली आहे. याबाबत वारंवार ‘महावितरणला निवेदने देण्यात आली. ‘महावितरणच्या निष्काळजीपणामुळे कुदळवाडीत तरुणाचा विद्युत धक्का लागून मृत्यू झाला. याला सर्वस्वी महावितरण जबाबदार आहे,’ असा आरोप यादव यांनी केला आहे.

शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला. या पावसात कनेक्टर स्लिप होऊन पडल्याने तार जमिनीवर आली. या तारेला तरुणाचा स्पर्श झाल्याने शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा अहवाल तयार करण्यात येणार आहे.- अतुल देवकर, कार्यकारी अभियंता, भोसरी विभाग.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments