Wednesday, November 29, 2023
Home क्राईम न्यूज लग्नाच्या 3 वर्षे आधीच दीपिका-रणवीरने गुपचूप उरकलेला साखरपुडा? करणचा सवाल

लग्नाच्या 3 वर्षे आधीच दीपिका-रणवीरने गुपचूप उरकलेला साखरपुडा? करणचा सवाल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई : 23 ऑक्टोबर 2023 | करण जोहरच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोचा आठवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 26 ऑक्टोबरपासून हा शो सुरू होणार असून त्याचा पहिला प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. करणच्या पहिल्याच एपिसोडमध्ये बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने हजेरी लावली आहे. शोच्या प्रोमोमध्ये हे दोघं विविध मुद्द्यांवर मजेशीर गप्पा मारताना दिसतात. यादरम्यान करणने दीपिका-रणवीरला त्यांच्या साखरपुड्याविषयी प्रश्न विचारला. लग्नाआधी तीन वर्षांपूर्वीच दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकला होता का, असा सवाल करणने विचारला.

2015 मध्ये तुम्ही दोघांनी साखरपुडा केला होता का, असा प्रश्न करणने विचारल्यावर रणवीर म्हणतो, “मी तिला 2015 मध्येच प्रपोज केलं होतं. दुसरी एखादी व्यक्ती तिच्या आयुष्यात येण्याआधीच मी विचार केला की आपणच आधी बुकिंग केलेली बरी.” हे ऐकल्यानंतर दीपिका म्हणते “अॅडव्हान्स बुकिंग. त्यानंतर करण आणि रणवीरसुद्धा हसू लागतात. या प्रोमो व्हिडीओमध्ये दीपिकाला करणने असाही प्रश्न विचारला की, “तू रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात रणवीरने साकारलेल्या रॉकी रंधावाच्या भूमिकेसारख्या व्यक्तीला डेट करशील का?” त्यावर दीपिका मजेशीरपणे म्हणते, “मी रॉकी रंधावाशीच लग्न केलं आहे.”

या व्हिडीओमध्ये करण दीपिकाला असाही प्रश्न विचारताना दिसतोय की, तिला रणवीरशिवाय कोणासोबतची केमिस्ट्री आवडते. त्यावर उत्तर देताना दीपिकाने हृतिक रोशनचं नाव घेतलं हृतिकसोबतची केमिस्ट्री चांगली जमते, असं ती म्हणाली. विशेष म्हणजे दीपिकाचा आगामी चित्रपट हा हृतिकसोबतच आहे. ‘फायटर’ या चित्रपटात दोघं एकत्र काम करणार आहेत.

दीपिका आणि रणवीरने 2018 मध्ये लग्न केलं. नोव्हेंबर 2018 मध्ये इटलीत या दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. या लग्नाला फक्त जवळचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित होता. लग्नाच्या आधी हे दोघं जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट करत होते. संजय लीला भन्साळी यांच्या ‘रामलीला’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमधील जवळीक वाढली.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments