Thursday, June 13, 2024
Homeक्राईम न्यूजलग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार; चार वेळा गर्भपात, दोघांवर गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार; चार वेळा गर्भपात, दोघांवर गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातील वानवडी परिसरात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विवाहित महिलेसोबत मैत्री केली, तसेच तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. त्यातून पिडीत महिलेला चार वेळा गरोदर करुन तिला जबरदस्तीने गोळ्या खाण्यास देऊन गर्भपात केला. हा प्रकार २०१७ ते २१ मे २०२४ या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत २९ वर्षीय पिडीत महिलेने मंगळवारी २१ मे रोजी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अमित चव्हाण (रा. काळेपडळ) व त्याचा मित्र अमोल (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिलेची परिसरात राहणाऱ्या आरोपी अमित सोबत २०१७ मध्ये ओळख झाली. त्या ओळखीतून आरोपीने महिलेसोबत मैत्री करुन लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून महिला गरोदर राहिली.

त्यानंतर आरोपीने तिला जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या खायला देऊन चार वेळा गर्भपात केला. तसेच आरोपीचा मित्र अमोल याने देखील महिलेकडे शारीरि सुखाची मागणी करुन अश्लिल बोलून विनयभंग केला, असं फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक टोणे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments