Monday, September 15, 2025
Homeक्राईम न्यूजलग्नाचे आमिष दाखवून बलात्काराचा आरोप; भारतीय जवानाला अटी व शर्तीसह जामीन मंजूर

लग्नाचे आमिष दाखवून बलात्काराचा आरोप; भारतीय जवानाला अटी व शर्तीसह जामीन मंजूर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः भारतीय सैन्य दलात नाईक पदावर असलेल्या जवानाचा लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या गुन्ह्यातून जामीन मंजूर झाला आहे. बलवंत सतवाल असे जामिन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती एस.एम. टाकळीकर कोर्टाने आरोपीस अटी व शर्तीवर जामीन मंजूर करण्याचे आदेश पारित केले आहेत. अशी माहिती आरोपीचे वकील अॅड. नितीन भालेराव यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेने आरोपी बलवंत याच्या विरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याची तक्रार दापोडी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात अली होती. आरोपी कारागृहात असताना आरोपीने अॅड. नितीन भालेराव यांच्या मार्फत जामिनाचा अर्ज दाखल केला होता.

आरोपी आणि पीडितेमध्ये प्रेम संबंध असल्याने तसेच दोघांमध्ये आत्ता काही बाबतीमुळे गैरसमज झाल्यामुळे फिर्यादीने खोटी तक्रार दिल्याचा आरोपी पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला. आरोपी पक्ष व सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस एम टाकळीकर कोर्टाने आरोपीस अटी व शर्तीवर जामीन मंजूर करण्याचे आदेश पारित केले आहेत. दरम्यान, या कामी अॅड. मीनाक्षी चव्हाण, अॅड. अजित शिंदे यांनी मदत केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments