इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे ता ६ : पुणे मेट्रोला: वाढता प्रतिसाद मिळताना दिसत आहे. किमान १० रुपये आणि जास्तीत जास्त ३५ रुपये असे तिकीट दर असल्याने अनेक पुणेकर रोजच्या प्रवासासाठी मेट्रोला पसंती देत आहेत. मेट्रोमुळे पुणेकरांचा प्रवास वेगवान आणि आरामदायी होत असल्याने दिवसागणिक मेट्रो मधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
पर्पल लाईन आणि अक्वा लाईन अशा दोन मार्गावर मेट्रो सुरु असून एकूण 30 स्थानके मेट्रोने जोडली गेली आहेत. त्यातील ५ स्थानके ही भुयारी आहेत. अक्वा लाईन ही वनाज ते रामवाडी आणि पर्पल लाईन ही स्वारगेट ते पीसीएमसी पर्यंत सेवा देत आहे. मेट्रोने जरी केलेल्या जानेवारीच्या प्रवासी आकडेवारी नुसार अक्वा लाईन (वनाज ते रामवाडी) वर पर्पल लाईन (स्वारगेट ते पीसीएमसी) च्या तुलनेत प्रवासी जास्त आहेत.
मेट्रोचे रोजचे प्रवासी किती?
जानेवारी २५ मध्ये पर्पल लाईनमधून २१ लाख ९८ हजार प्रवाशांनी प्रवास केला. तर अक्वा लाईन मार्गावरून २७ लाख ६६ हजार ११० प्रवाशांनी प्रवास केला. दोन्ही मार्गावरून दररोज सरासरी दीड ते २ लाख प्रवासी (daily Pune metro commuters) प्रवास करत आहेत. जानेवारीत एकूण ४९ लाख ६४ हजार पुणेकरांनी मेट्रो प्रवास केला. त्यातून पुणे मेट्रोला ७ कोटी ८७ लाख ४८ हजार १९४ रुपये उत्पन्न मिळाले आहे.
मेट्रोची वेळ वाढविलीः
सध्याच्या मेट्रो मार्गाचा लवकरच स्वारगेट ते कात्रज आणि पीसीएमसी ते भक्ती शक्ती चौक असा विस्तार होत असून त्यातून आणखी प्रवासी मेट्रोशी जोडले जाणार आहेत. दरम्यान पुणे मेट्रोच्या प्रवासी सेवेत दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजीपासून एका तासाची वाढ करण्यात आली असून ही सेवा सकाळी ६:०० ते रात्री ११:०० वाजेपर्यत (एकूण १७ तास) प्रवाशांसाठी उपलब्ध आहे.