Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजरेशन कार्डसंदर्भात सरकार अॅक्शन मोडवर ! आता प्रत्येक रेशन कार्डची तपासणी होणार...

रेशन कार्डसंदर्भात सरकार अॅक्शन मोडवर ! आता प्रत्येक रेशन कार्डची तपासणी होणार…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता) 

पुणे : राज्य सरकारने अपात्र रेशन कार्ड शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील अंत्योदय, केशरी व शुभ्र अशा सर्व प्रकारच्या रेशन कार्डाची तपासणी केली जाणार आहे. या तपासणी मोहिमेचा मुख्य उद्देश अपात्र आणि बनावट कार्डधारकांना ओळखणे आणि त्यांच्या रेशन कार्डाना तत्काळ रद्द करणे हा आहे. ही मोहीम 1 एप्रिलपासून सुरु करण्यात आली आहे.

अन्न व नागरी पुरवठा विभागाने रेशनकार्ड बाबत आदेश जारी करतराज्यभरात अपात्र रेशन कार्डधारक शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. प्रत्येक रेशनकार्डच्या तपासणी प्रक्रियेसाठी प्रत्येक रेशन दुकानदाराला त्यांच्या दुकानातील कार्डाची माहिती तपासण्यासाठी फॉर्म दिले जातील. कार्डधारकांकडून वास्तव्याचा पुरावा मागवण्यात येणार आहे. ज्यांनी पूर्वी पुरावा सादर केलेला नसेल, त्यांना 15 दिवसांची मुदत देण्यात येईल. या कालावधीत पुरावा न सादर केल्यास संबंधितांचे रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे.

राज्यातील अंत्योदय, केशरी व शुभ्र अशा सर्व प्रकारच्या रेशन कार्डाची तपासणी केली जाणार आहे. सरकारने या मोहिमेसाठी सर्व संबंधित यंत्रणांना दिशा-निर्देश देत कार्यवाही सुरू केली आहे. नागरिकांनी सहकार्य करून आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करावीत, असे आवाहनही करण्यात आले आहे. योग्य पात्रतेच्या आधारावरच रेशन सुविधा मिळावी, हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments