Tuesday, January 14, 2025
Homeक्राईम न्यूजरेनबो इंटरनॅशनल स्कूलचे क्रीडाशिक्षक निखिल जाधव यांना राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक

रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे क्रीडाशिक्षक निखिल जाधव यांना राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लोणी काळभोर, (पुणे) मास्टर्स गेम असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय भालाफेक व थाळीफेक या दोन्ही स्पर्धेत रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे क्रीडाशिक्षक निखिल जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकवून सुवर्ण पदक पटकाविले आहे.

या दोन्ही स्पर्धा या नाशिक येथे नुकत्याच पार पडल्या आहेत. तर ओडिसातील भुवनेश्वर येथे मार्चमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी जाधव यांची निवड झाली आहे. निखिल जाधव यांनी वैयक्तिक भालाफेक खेळामध्ये सुवर्णपदक व थाळीफेक या खेळामध्ये वैयक्तिक आयुष्यात सुवर्णपदक असे दोन सुवर्णपदक पटकावले. सुवर्ण पदक पटकावून विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

या स्पर्धेसाठी रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन नितीन काळभोर, स्कूलच्या सेक्रेटरी मंदाकिनी काळभोर, प्राचार्या मीनल बंडगर, उपप्राचार्य प्रशांत लाव्हरे, दीपक शितोळे, आश्विन मनगुतकर, धनंजय मदने व महेंद्र बाजारे या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. पुढील होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शाळेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments