इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : रुबी हॉल क्लिनिकमध्ये अवैध किडनी प्रत्यारोपण रॅकेट प्रकरणाची सार्वजनिक आरोग्य विभागाने उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. तसेच येत्या तीन महिन्यांत समिती आपला अहवाल सादर करणार आहे. आतापर्यंत चौकशी करण्यासाठी तीन वेळा समिती स्थापन झाली आहे. आता नवीन समितीत विविध विभागांचे मिळून एकूण नऊ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
यापूर्वी जुलै २०२३ मध्ये राज्य सरकारने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश चंद्रकांत भडंग यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली होती. त्यामध्ये पुन्हा सुधारणा करण्यात आली होती. या चौकशी समितीचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश चंद्रकांत भडंग होते. परंतु, त्यांनी इन्कमटॅक्स अपिलेट ट्रिब्युनल अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यामुळे पुढे चौकशी चालू ठेवणे शक्य नाही, असे कळवल्याने आता न्यायाधीश संदीप शिंदे यांची समितीचे नवीन अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
नवीन चौकशी समिती अध्यक्ष संदीप के. शिंदे (निवृत्त न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय), सदस्य अरविंद चावरिया, पुणे शहर अपर पोलीस आयुक्त (प्रशासन), सदस्य- आरोग्य सेवा संचालक, सदस्य सचिव आरोग्य सेवा उपसंचालक, सदस्य- भाग्यश्री रंगारी, विधी सल्लागार, आरोग्य सेवा, आयुक्तालय, मुंबई, सदस्य – डॉ. सुजाता पटवर्धन, संचालक, रोटो-सोटो केईएम हॉस्पिटल, मुंबई, सदस्य डॉ. प्रवीण शिंगारे, माजी संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, सदस्य डॉ. सुरेंद्र माथुर, प्रेसिडेंट, ट्रान्सप्लांट को-ऑपडिनेशन सेंटर, मुंबई, सदस्य डॉ. भरत शहा, प्रत्यारोपणतज्ज्ञ, ग्लोबल हॉस्पिटल, सदस्य डॉ. अरुण तिरलापूर, नेफ्रॉलॉजिस्ट, पुणे.