Tuesday, January 14, 2025
Homeक्राईम न्यूजरुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त नातलगांनी केली भारती रुग्णालयाची तोडफोड

रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त नातलगांनी केली भारती रुग्णालयाची तोडफोड

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : धनकवडीतील भारती रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या रागातून त्याच्या नातलगांनी मंगळवारी (दि. ७) या रुग्णालयात तोडफोड केली. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व मारहाण करण्यात आली. याप्रकरणी डॉ. अंकिता अर्पित ग्रोवर (वय ३६) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार, महाराष्ट्र वैद्यकीय संस्था अधिनियम, तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारती हॉस्पिटलमध्ये तेजराज जैन (वय ८६) यांचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे जैन यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करून नातेवाइकांनी बाह्यरुग्ण विभागाच्या परिसरात मंगळवारी (दि. ७) दुपारी सव्वावाराच्या सुमारास गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांना रुग्णालयातील सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. जैन यांच्या नातलगांनी सुरक्षारक्षक तृप्ती लोखंडे, श्रीदेवी डोईफोडे, निर्मला लष्कर, तसेच रुग्णलायातील कर्मचारी सुनील दाते, अतुल शिंदे, चैतन्य दधस, प्रशांत ओव्हाळ यांनां शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.

तसेच, रुग्णालयात आरडाओरडा करून त्यांनी लाकडी स्टुल रुग्णलयातील केबीनच्या काचेवर फेकून मारला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नातलगांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments