Thursday, March 20, 2025
Homeक्राईम न्यूजरिलायन्सचे शेअर्स पोहोचले 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर; मार्केट कॅपमध्ये सुमारे 56000...

रिलायन्सचे शेअर्स पोहोचले 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर; मार्केट कॅपमध्ये सुमारे 56000 कोटींची घट

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठ्याघडामोडी होताना दिसत आहे. त्यात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे शेअर्स सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात घसरले आणि 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले. बीएसईवर 3.63% घसरून 1156.00 रुपयांवर आला. यामुळे कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये सुमारे 56000 कोटी रुपयांची घट झाल्याचे दिसून आले.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, रिलायन्स न्यू एनर्जी लिमिटेड (RNEL) ला बॅटरी सेल प्लांट स्थापित करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल $14 दशलक्षपेक्षा जास्त दंड भरावा लागणार आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) भारतीय शेअर्सची सातत्याने विक्री करत आहेत, ज्यामुळे देशांतर्गत बाजारात सातत्याने घसरण होत आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये, कडक आर्थिक धोरणे, राजकीय तणाव आणि मजबूत अमेरिकन डॉलरच्या चिंतेमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून माघार घेतली आहे. त्याचा परिणाम रिलायन्सच्या शेअर्सवरही दिसून आला आहे.

रिलायन्सचे शेअर्स गेल्या सहा महिन्यांत 23% घसरले आहेत आणि 1608.95 च्या उच्चांकावरून 28% खाली आले आहेत. त्यातच काही महिन्यांत परदेशी गुंतवणूकदार सातत्याने भारतीय शेअर्सची विक्री करत आहेत. यामुळे RIL सारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सवर दबाव आला आहे. परिणामी, कंपनीचे बाजार भांडवल घसरले आहे. रिलायन्सचे मार्केट कॅप आता 1569146.30 कोटी रुपयांवर गेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments