Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे एक लाखांचा लॅपटॉप केला परतः मुंढवा पोलिसांकडून कष्टकरी रिक्षाचालकाचा...

रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे एक लाखांचा लॅपटॉप केला परतः मुंढवा पोलिसांकडून कष्टकरी रिक्षाचालकाचा सन्मान

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंढवा पोलीस ठाण्याचे हद्दीतील एक गरीब कष्टकरी रिक्षाचालक नवनीत लाल गुगळे (मु, रा. नेवासा, अहमदनगर) हे खराडी ते हडपसर असे भाडे घेऊन जात होते. त्यावेळी मुंढवा अओव्हरब्रीजवर त्यांना एक लेडीज बॅग मिळून अाली. मात्र, त्यांनी कोणताही लोभ न करता संबंधित बॅग मुंढवा पोलीस ठाण्यात आणून दिली. पोलीसांनी बॅगची पाहणी केली असता, त्यात एक लाख दहा हजार रुपये किंमतीचा एक महागडा लॅपटॉप, चार्जर, मोबाईल चार्जर याच्यासह अाधारकार्ड, पॅनकार्ड, एटीएम कार्ड, गाडीचे अारसी बुक अगदी मौल्यवान साहित्य होते. रिक्षाचालकाने प्रमाणिकपणे संबंधित बॅग पोलीस ठाण्यात अाणून दिल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बाळकोटगी यांनी रिक्षाचालकाचा सन्मान केला.

मुंढवा पोलीसांनी सदर बॅग मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित अारसी बुक वरील अारटीअो नंबरवरुन वाहन मालकाचे नाव, मोबाईल क्रमांक प्राप्त करण्यास सुरुवात केली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश उगले यांनी सदर माहिती काढत, ममतोष प्रकाश (रा. पटना) यांच्याशी संर्पक केला. त्यांनी त्यांची मुलगी माही मुस्कान ही पुण्यात अमेनॉरा सिटी येथे राहत असल्याचे सांगितले. संबंधित वाहन मुलगी वापरत असल्याने त्यांनी सांगितल्याने, पोलीसांनी माही हिच्याशी संर्पक करत, तिला पोलीस ठाण्यात बोलवले. सदर लेडीज बॅगजी व त्यातील किंमती मुद्देमाल व अओळखपत्राची खातरजमा करुन पोलीसांनी सदर बॅग माही हिला परत करण्यात अाली. तिने लॅपटॉपसह इतर किमती वस्तू मिळाल्याने अानंदी होऊन पोलीसांचे व रिक्षाचालकाचे अाभार मानले. या कामगिरीकरता प्रामाणिक रिक्षाचालक नवनीत गुगळे यांचा वपोनि महेश बोळकोटगी यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. सदरची कामगिरी सहा. पोलीस फौजदार रमेश उगले, पोलीस अंमलदार नलेश पालवे, सचिन अडसूळ यांचे पथकाने केली अाहे.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments