Friday, April 19, 2024
Homeक्राईम न्यूजरिक्षाचालकने अल्पवयीन मुलास जंगलात नेऊन लुटले

रिक्षाचालकने अल्पवयीन मुलास जंगलात नेऊन लुटले

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

रिक्षाचालकाने साथीदारांच्या मदतीने अल्पवयीन प्रवासाला लुटल्याची घटना घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी एका १७ वर्षीय तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षाचालक अक्षय त्याच्या मित्र प्रेम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वानवडी इंडस्ट्रियल एरिया मधील जंगलात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, तक्रारदार याने मुंढवा येथे घरी जाण्यासाठी गाडीतळ येथून आरोपी अक्षयच्या रिक्षा मध्ये बसला. यावेळी रिक्षात याआधीच एक जण बसला होता. रिक्षा ही वानवडी इंडस्ट्रियल एरिया मधील जंगलात आली असताना शेजारी बसलेल्या एकाने फिर्यादीचे तोंड दाबले आणि जबरदस्तीने हातातील चांदीचे ब्रेसलेट, मोबाईल आणि रोख रक्कम असा २० हजारांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेत त्याला तिथेच जंगलात सोडून आरोपींनी पळ काढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस पाटील करत आहे.

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने लुटमार पुणे शहरातील विविध भागात दुचाकीस्वार चोरटे सुसाट गुन्हे करत फिरत आहेत. महिलांचा पाठलाग करून ऐवज लुटणे, जेष्ठ नागरिकांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोबाइल हिसकाविण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. पत्ता विचारण्यासाठी थांबलेल्या जेष्ठाच्या खिशातील ३५ हजारांचा मोबाइल दुचाकीस्वार दोघा चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना बाणेर पाषाण लिंक रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी जेष्ठाने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments