इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. या घटनेला महिनाभराचा कालावधी होऊनही याचे पडसाद उमटत आहेत. अजूनही राहुल सोलापूरकर यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. ती घटना मागे पडतेच तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल प्रशांत कोरटकर यांनी वादग्रस्त विधान केल्याचे समोर आले असून यावरून पुन्हा एकदा शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. या घटनांच्या निषेधार्थ शिवाजीनगर परिसरातील एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या मैदानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आता संभाजी ब्रिगेडकडने आत्मक्लेश आंदोलन केले आहे.
आंदोलनावेळी संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष प्रशांत कुंजीर म्हणाले, “मागच्या अनेक वर्षांपासून विशिष्ट विचारसरणीच्या लोकांकडून महापुरुषांसंबंधित वादग्रस्त वक्तव्य केले जात आहे. मात्र अशा लोकांना राज्य सरकारकडून संरक्षण दिले जात आहे. आम्ही या ठिकाणी अशा वक्तव्यांचा निषेध म्हणून आज आंदोलन करत आहोत. राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर या दोघांवर कडक कारवाई करण्यात यावी. याची दखल राज्य सरकारने घ्यावी अन्यथा भविष्यात मोठे आंदोलन करण्यात येईल”. असा इशारा कुंजीर यांनी सरकारला दिला आहे.