Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज राहुल गांधीच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'ला सुरु होण्यापूर्वीच ग्रहण ! मणिपूर सरकारची...

राहुल गांधीच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला सुरु होण्यापूर्वीच ग्रहण ! मणिपूर सरकारची मनाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई | 10 जानेवारी 2024 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात होण्यापूर्वीच ग्रहण लागले आहे. राहुल गांधीच्या यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात 14 जानेवारीपासून मणिपूर राज्यातून होणार होती. परंतू मणिपूर राज्यातील सध्याची कायदा सुव्यवस्था पाहाता मणिपूरच्या मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी यात्रेला परवानगी देण्यास नकार दिला आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरच्या इम्फाळ येथील पॅलेस ग्राऊंड येथून सुरु होणार होती. मणिपूर येथील सध्याची परिस्थिती पाहून राहुल गांधी यांनी मणिपूर सरकारने परवानगी न दिल्याने आता त्यांना दुसऱ्या ठिकाणाहून आपली भारत जोडो न्याय यात्रा सुरु करावी लागणार आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांच्या निकालानंतर पुन्हा आपली पदयात्रा सुरु करण्याची घोषणा केली होती. यावेळी ही पदयात्रा मणिपूर येथून सुरु होऊन मुंबईत तिचा समारोप होणार आहे. या यात्रेला आधी न्याय यात्रा असे नाव दिले होते. त्यानंतर तिचे नाव बदलून ‘भारत जोडो, न्याय यात्रा’ असे ठेवण्यात आले आहे. ही पदयात्रा 14 जानेवारीला मकरसंक्रातीच्या दिवशी सुरु होऊन 20 मार्च रोजी तिचा समारोप होणार आहे. मणिपूर येथून यात्रेला परवानगी नाकारण्याचा राज्य सरकारचा निर्णय दुर्भाग्यपूर्ण असल्याचे मणिपूर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कीशम मेगाचंद यांनी म्हटले आहे. आम्ही मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांची भेट घेतली. आणि इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील हट्टा कांगेजेइबुंग येथून यात्रेची परवानगी मागितली. येथे एक सभा झाल्यानंतर यात्रेला हिरवा झेंडा दाखविला जाणार होता. परंतू मुख्यमंत्र्यांनी परवानगी देण्यास नकार दिल्याचे मेगाचंद्र यांनी सांगितले.

आम्हाला राजकारण करायचे नाही

आम्हाला या यात्रेतून काही राजकारण करायचे नाही. आम्हाला मणिपूरचा काही मुद्दा करायचा नाही. ही एक शांततापूर्ण यात्रा आहे. ही यात्रा आम्ही भारताच्या लोकांसाठी काढत आहोत. विशेष करून मणिपूरच्या लोकांसाठी ही यात्रा आहे. हा काही हिंसा मार्च नाही. आम्ही सरकारला सहकार्य करतोय याचा अर्थ असा नाही की त्यांनी आमची यात्राच रोकावी असा सवाल काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments