इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
शिरूर : सध्या प्रत्येक रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे वीजवितरण कंपनीने होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय, राज्य व इतर अन्य मार्गांच्या कडेला विद्युत रोहीत्रे रस्त्यांच्या कडेला बसवू नये. अशा सुचना वीजवितरण कंपनीला देण्यात आल्या असल्याची माहीती शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी दिली.
न्हावरे येथील घोडगंगा साखर कारखान्याच्या जवळच न्हावरे-चौफूला या राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असणाऱ्या वीजवितरण कंपनीच्या विद्युत रोहीत्राला कार धडकल्याची घटना घडली होती. त्यामुळे शॉटसर्कीट होऊन एका प्लास्टिक कारखान्याच्या गोडाऊनला आग लागली आणि यामध्ये गोडाऊन व गोडाऊन मधील विविध प्रकारचे साहित्य, मशिनरी जळून खाक होऊन एका व्यावसायिकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.
दरम्यान, या घटनेची पाहणी करण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर कटके घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी आमदार कटके यांनी उपस्थितांशी संवाद साधला. पुढे आमदार कटके यांनी माहिती देताना सांगितले की, सध्या सर्वत्र रस्त्याच्या कडेला व्यावसायिकीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे व्यावसायिकांना आवश्यक असणाऱ्या विजेसाठी विद्युत रोहित्रे महावितरणने अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेलाच बसविली आहेत.
सध्या सर्वच रस्त्यावर वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळेच रस्त्याच्या कडेला वीजवितरण कंपनीचे विद्युत रोहीत्रे बसवू नयेत. अन्यथा न्हावरे येथे ज्याप्रमाणे अपघात झाला व यामध्ये त्रिमूर्ती प्लास्टीक शॉप व गोडाऊन जळून खाक झाले होते आणि त्यामध्ये संबंधित व्यावसायिकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अशीच घटना पुन्हा कोणाबाबत घडू नये त्यासाठी भविष्यात रस्त्याच्या कडेला विद्युत रोहित्रे बसवू नये. अशा प्रकारच्या सूचना आमदार कटके यांनी दिल्या आहेत.
सध्या प्रत्येक रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तरी यापुढे वीजवितरण कंपनीने होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी विद्युत रोहीत्रे रस्त्यांच्या कडेला बसवू नये. यासाठी आपण न्हावरे येथे वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे आमदार कटके यांनी यावेळेस उपस्थित ग्रामस्थांना सांगितले.