इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : जी.एच. रायसोनी स्किल टेक युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी अर्जुन शर्मा, देवांश सिंग, अर्पित मौर्य, आरुष सिंग यांनी ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे (एआयएसएसएमएस) अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे द्वारा आयोजित राष्ट्रीय स्तरावरील टेकाथॉन 2.0 स्पर्धेत उत्तम कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावरील दिवंगत रतन टाटा इनोव्हेशन पुरस्कार जिंकला आहे.
जीएच रायसोनी स्किल टेक युनिव्हर्सिटीच्या ड्रोन डेव्हलपमेंट क्लबचे प्रभारी अमित कुमार यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली, टीमने देशभरातील काही सर्वोत्तम अभियांत्रिकी संस्थांविरुद्ध स्पर्धा करत त्यांच्या नाविन्यपूर्ण कौशल्याचे प्रदर्शन केले.
स्पर्धेतील विजेत्यांना 25 हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेत एकूण 1300 विद्यार्थी आणि 320 संघ सहभागी झाले होते. यातून एक हजार नवीन कल्पना नोंदणीकृत झाल्या, तर 320 कल्पना अंतिम फेरीसाठी निवडल्या गेल्या होत्या. यात रायसोनी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट “वाहतूक सुरक्षा – मेट्रो शहरांभोवती महामार्गावर अपघातांसाठी आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा वाढवणे” या समस्येचे निराकरण करण्यासाठीचा प्रोजेक्टद्वारे सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण कल्पना सादर करत वरील पुरस्कार जिंकला.
याबाबत बोलताना कुलगुरू डॉ. एम. यू. खरात म्हणाले, “आमच्या विद्यार्थ्यांनी हा पुरस्कार जिंकून असाधारण सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्य दाखवले आहे. त्यांचे यश हे आमच्या विद्यापीठाने वाढवलेल्या उच्च-गुणवत्तेच्या शिक्षण, मार्गदर्शन आणि संशोधन वातावरण निर्मितीचे प्रमाण आहे. रतन टाटा इनोव्हेशन माइंड्स पुरस्कार हा एक अत्यंत प्रतिष्ठित सन्मान आहे, जो तरुण अभियंत्यांना तंत्रज्ञानाच्या सीमा ओलांडण्यास आणि समाजात अर्थपूर्ण योगदान देण्यास प्रोत्साहित करतो. जीएच रायसोनी स्किल टेक युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांना उद्योगाधारित शिक्षण अनुभवांसह सक्षम करत राहते, त्यांना जागतिक आव्हानांसाठी तयार करत असल्याचा त्यांनी सांगितलं.