Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजरायदंडवाडी येथील शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू

रायदंडवाडी येथील शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

वेल्हे, (पुणे) : रायदंडवाडी, घिसर (ता. राजगड) येथील शेतकऱ्याचा येथील गावकीच्या विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना आज रविवार (ता. २८) रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली असून याबाबत वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती वेल्ह्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांनी दिली.

बबन राघू कचरे (वय. ५५) राहणार रायदंडवाडी, घिसर (ता. राजगड) असे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव असून याबाबत मुलगा रघुनाथ बबन कचरे (वय. 33) याने वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गावकीच्या विहिरीवर जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेलेले बबन कचरे हे बराच वेळ परत घरी न आल्याने त्यांना पाहण्यासाठी त्यांची पत्नी विहिरीवर गेली असता विहीरीच्या काढावर चप्पल व टोपी दिसली सदरची माहिती पोलीस पाटील सुनील धिंडले यांना कळवली असता पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशनला संपर्क केला घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल वैजनाथ घुमरे, मयूर जगताप यांनी परिसरात पाहणी केली परंतु ते न दिसल्याने त्यांनी विहिरीत शोध घेतला लोकांच्या मदतीने विहिरीत पडलेल्या बबन कचरे यांना वरती काढण्यात आले.

पोलिसानी दरम्यान खाजगी टेम्पो वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाची डॉक्टर चंद्रकांत भोईटे यांनी दिली. या प्रकरणी वेल्ह्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रदीप कुदळे अधिक तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments