इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
रायगड : रायगडातील महाड-विन्हेरे मार्गावर कुरले गावाजवळ दोन एसटींमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दोन बसमधील दोन चालक व एक वाहक व नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी चार वाजण्याच्या फौजी आंबोडे गावातून दुपारी तीन वाजता सुटणारी फौजी-अंबवडे-पुणे व महाड आगारातून दुपारी चार वाजता सुटणारी महाड-फौजी-अंबवडे या दोन बस पुरले गावाजवळ रस्त्यावर समोरासमोर आल्या. त्यावेळी पडणाऱ्या पावसामुळे हा रस्ता निसरडा व गुळगुळीत झाल्याने या बसेसचा अपघात घडला आहे. या अपघातात दोन बसमधील दोन चालक व एक वाहक व नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान महाड-दापोली या मार्गावर आठवडाभरात सात अपघात झाले आहेत.
आज झालेल्या एसटीच्या अपघातात देखील प्रवासी जखमी झाले आहेत. तीव्र उतार आणि डांबरी गुळगुळीत रस्ता त्यात अवकाळी पावसाचा मारा यात वाहने घसरून एकमेकांवर आदळल्याने अपघात घडत आहेत. मागील आठ दिवसांत या मार्गावर एसटीचे दोन तर इतर वाहनांचे असे एकूण सात अपघात झाले आहेत.