Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज रातोरात ४० गावकऱ्यांच्या बँकेत अचानक जमा झाले २-२ लाख; पुढे काय घडलं?...

रातोरात ४० गावकऱ्यांच्या बँकेत अचानक जमा झाले २-२ लाख; पुढे काय घडलं? वाचा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

ओडिशातील केंद्रपाडा जिल्ह्यातील एका गावात रातोरात गावकरी लखपती बनले. या लोकांच्या बँक खात्यावर अचानक पैसे पाठवले. जवळपास ४० बँक खात्यांवर इतकी मोठी रक्कम जमा करण्यात आली होती. ज्यावेळी बँकेत पैसे जमा झाल्याचा मेसेज खातेधारकांना मिळाला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. परंतु इतके पैसे कुठून आले, कुणी पाठवले याबाबत ते गोंधळात पडले. बँक खात्यावर पैसे आल्यानंतर दुसऱ्या दिवशी बँकेत लोकांची गर्दी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण केंद्रपाडा जिल्ह्यातील औल ब्लॉकमधील ओडिशा ग्रामीण बँकेच्या बाटीपाडा शाखेतील आहे.

या बँकेच्या खातेधारकांच्या खात्यावर मोठ्या प्रमाणात पैसे जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे हे पैसे काढण्यासाठी लोकांनी बँक गाठली. या काळात काही लोकांनी पैसे काढले तर काहींना रिकाम्या हाती घरी परतावे लागले.

खातेधारकांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला. त्यात हजारांपासून २ लाखांपर्यंत रुपये क्रेडिट झाल्याची माहिती देण्यात आली. जेव्हा लोकांनी हे मेसेज पाहिले त्यांनी बँकेत पैसे काढण्याची गर्दी केली. कधी नव्हे इतकी लोकांची गर्दी बँकेत झाल्याने अधिकाऱ्यांना संशय आला. पैसे काढण्यासाठी लोकांची गर्दी वाढतच चालली होती. त्यामुळे बँक खात्यांमध्ये जमा झालेल्या रक्कमेवर शंका आल्याने अधिकाऱ्यांनी तात्काळ लोकांना पैसे काढून देण्याची सुविधा बंद केली.

सुरुवातीला काही लोक बँकेत पोहचले त्यांनी खात्यावरून पैसे काढले, सगळे काही रोजच्य सारखे सुरळीत सुरू होते. परंतु जेव्हा बँकेत पैसे काढण्यासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी वाढली तेव्हा बँक अधिकाऱ्यांना संशय आला. त्यानंतर बँक खाती तपासली असता त्यात रात्री अचानक मोठमोठी रक्कम प्रत्येकाच्या बँक खात्यात जमा झाल्याचे कळाले. त्यानंतर ही रक्कम संशयास्पद असल्याने बँक अधिकाऱ्यांनी अनिश्चित काळासाठी पैसे काढण्याची सुविधा बंद केली. सध्या या प्रकरणाचा बँक अधिकारी तपास करत आहेत. अखेर लोकांच्या खात्यात हे पैसे कुणी टाकले त्याचा काही सोर्स आहे का याची चौकशी सुरू आहे.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments