इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे | 18 नोव्हेंबर 2023 : आज राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक होत आहे. मराठा समाज मागास आहे का? याची चाचपणी करण्यासाठी ही बैठक होणार आहे. पुण्यात राज्य मागासवर्गीय आयोगाची ही बैठक होणार आहे. सकाळी 11 वाजता व्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये बैठकीला सुरुवात होणार आहे. मराठा आरक्षणावर आज महत्त्वाची चर्चा आयोगात होणार आहे. राज्य मागास आयोगाच्या अध्यक्षांसह 10 सदस्य बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मराठा समाज मागास आहे की नाही, याची चाचपणी केली जाणार आहे. दरम्यान संभाजीराजे छत्रपती हे देखील आयोगाची भेट घेणार आहेत.
संभाजीराजे आज आयोगाची भेट घेणार
स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे आणि शिष्टमंडळ आज राज्य मागासवर्गीय आयोगाची भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मागासवर्गीय आयोगासोबतच्या भेटीला महत्व आहे. सकाळी 11 वाजता राज्य मागासवर्गीय आयोगाची ते भेट घेणार आहेत. आहेत. आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचं आर्थिक दृष्ट्या मागास असल्याची पडताळणी सध्या केली जात आहे. तसंच मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने ही भेट महत्वाची आहे.