Friday, November 22, 2024
Homeक्राईम न्यूजराज्यात सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेघ; अमोल कोल्हे यांचं भाकीत

राज्यात सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेघ; अमोल कोल्हे यांचं भाकीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

आंबेगाव : सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वार वाहू लागले आहे. याच पार्शवभूमीवर सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. अनेक नेत्यांनी गाव दौरे सुरु केले असून सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेंकावर टीका करताना दिसत आहेत. अशातच आता शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील गाव वाड्या-वस्त्यांना भेटी देऊन या भागाचा दौरा केला आहे. यावेळी तेरुंगण येथे उपस्थितांना मार्गदर्शन करताना अमोल कोल्हे यांनी एक भाकीत केलं आहे. ते म्हणाले, आगामी काळात महाराष्ट्रातील सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे असं अमोल कोल्हे यांनी सांगितले.

नेमकं काय म्हणाले अमोल कोल्हे?

अमोल कोल्हे म्हणाले की, देशाचे नेते शरद पवार यांनी सुरुवातीला आदिवासी बांधवांसाठी स्वतंत्र बजेट काढले, जेव्हा जेव्हा आदिवासी बांधव अडचणीत असतील तेव्हा पवार साहेब त्यांच्या मागे ठाम उभे राहिले आहेत. याची उतराई म्हणून आदिवासी बांधव हे आजपर्यंत शरद पवार यांना विसरले नाहीत. त्याचे उदाहरण म्हणजे आताची लोकसभा निवडणूक. आता दोन-तीन महिने राहिले आहेत. महाराष्ट्राचे हे सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असं भाकीत अमोल कोल्हे यांनी यावेळी केलं आहे.

या दौऱ्यादरम्यान आदिवासी बांधवानी रस्ता, वीज, हिरडा, बेरोजगारी, पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी, रेशनिंग कार्डवरती मिळणारे धान्य, नवीन रेशनिंग कार्ड फॉरेस्टमधील याबाबतच्या अडीअडचणी खासदार अमोल कोल्हे यांच्या समोर मांडल्या. या अडीअडचणी समजून घेत लवकरच यावर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन अमोल कोल्हे यांनी आदिवासी बांधवांना दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments