Tuesday, January 14, 2025
Homeक्राईम न्यूजराज्यात थंडीचा जोर ओसरला; तापमान ८ अंशावरून थेट १२ अंशावर

राज्यात थंडीचा जोर ओसरला; तापमान ८ अंशावरून थेट १२ अंशावर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : गेल्या आठवड्यापासून नागरिक थंडीने गारठून गेले होते. पण शुक्रवार दि. २० डिसेंबरपासून किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीचा जोर कमी झाला आहे. गुरूवारी किमान तापमानाचा पारा ८ अंशावर होता, तो शुक्रवारी थेट १२ अंशावर आला आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. उत्तरेकडील थंड व कोरड्या वाऱ्यांचे प्रवाह महाराष्ट्राकडे झेपावत आहेत. त्यातच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात बाष्पयुक्त वारे येत आहेत.

त्यामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ होत थंडीत किंचित घट झाल्याचे जाणवत आहे. मात्र, राज्यातील काही भागात थंडीची लाट अजून कायम आहे. काही भागातील तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली असल्याने नागरिकांना हुडहुडी भरत आहे. येत्या दोन दिवसांमध्ये राज्यात थंडी कायम राहणार असली तरी किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नैऋत्य बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. ही प्रणाली शुक्रवारी उत्तर तमिळनाडू दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकून जमिनीवर येण्याचे संकेत आहेत.

पुढील पाच दिवस म्हणजे मंगळवार दि. २४ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात थंडीची लाट ओसरणार असून सुरुवात देखील झाली आहे. किमान तापमानात वाढ होऊन उबदारपणा जाणवू शकतो. पुन्हा वर्षअखेर व नववर्षातील ३० डिसेंबरपासून थंडीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

पुण्यात पहाटे गारठा, दिवसा उकाडा

पुणे शहरातील वातावरणात अचानक बदल झाला असून, ढगाळ वातावरणामुळे किमान व कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसा उकाडा जाणवत आहे. मात्र, पहाटे थंडीचा कडाका कायम आहे. गेले आठ दिवस शहरात थंडीने चांगलाच जोर धरला होता. मात्र, शुक्रवारपासून किमान तापमानात ३ ते ४ अंशांनी वाढ झाली, तर कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ झाली.

त्यामुळे सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत वाजणारी थंडी अचानक कमी झाली. वातावरणात उकाडा निर्माण झाला, तसेच सायंकाळी सहा वाजता सुटणारा गारठा आता रात्री १० नंतर जाणवत आहे. गत बारा तासांत हा मोठा बदल शहराच्या वातावरणात झाला आहे. आगामी तीन दिवस असे वातावरण राहील असा प्राथमिक अंदाज आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments