Monday, January 13, 2025
Homeक्राईम न्यूजराज्यात थंडीचा कडाका वाढला...! पश्चिम महाराष्ट्रासह, विदर्भ, मराठवाड्यात थंडीची तीव्र लाट

राज्यात थंडीचा कडाका वाढला…! पश्चिम महाराष्ट्रासह, विदर्भ, मराठवाड्यात थंडीची तीव्र लाट

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : राज्यात थंडी वाढली आहे. उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात मागील तीन दिवसांपासून गारठा वाढला. शुक्रवारपासून (13 डिसेंबर) थंडीची लाट तीव्र होत जाणार असून ती 18 डिसेंबरपर्यंत राहणार आहे, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान गुरुवारी विदर्भ आणि मराठवाडा गारठण्यास सुरुवात झाली असून विदर्भाचा पारा गुरुवारी दहा अंशांखाली गेला होता. पाकिस्तानातून पश्चिमी चक्रवात सक्रिय होत उत्तर भारतात आला आहे. त्यामुळे काश्मीरपासून मध्य प्रदेशपर्यंतचा भाग गुरुवारपासून चांगलाच गारठला आहे.

राजस्थानातील सिकर येथे गुरुवारी एक अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. हंगामातील हे सर्वात कमी तापमान ठरले. त्या भागातून राज्यात शीतलहरी येत आहेत. त्याची सुरुवात विदर्भापासून झाली असून 13 ते 18 डिसेंबरपर्यंत किमान तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे.

गुरुवारचे किमान तापमान

नागपूर 9.8, गोंदिया 9.8, वर्धा 10.5, नाशिक 11.7, अकोला 12.5, अमरावती 11.4, बुलडाणा 13, ब्रह्मपुरी 11.8, धाराशिव 12, छ. संभाजीनगर 12, परभणी 11.5, बीड 11.9, पुणे 13.3, अहिल्यानगर 11.5, जळगाव 10.3, महाबळेश्वर 13.6, मालेगाव 13.6, मुंबई 21.6, कोल्हापूर 18.2, सांगली 17.2, सातारा 15.5, सोलापूर 16.4.

दिल्लीपासून राजस्थानपर्यंत उत्तरेत थंडीची लाट

दरम्यान, राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांमध्येही थंडीने कहर केला आहे. चुरू आणि सिकरने तर माउंट अबूचा विक्रम मोडीत काढला. सीकरमध्ये किमान तापमान १.५ अंश नोंदवले गेले. तर चुरूमध्ये १.८ अंशांची नोंद झाली. माऊंट अबूमध्ये कमाल तापमान १६ अंश तर किमान ३ अंश इतके नोंदवले गेले आहे, तापमानात घट झाल्याने दवामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ११ जिल्ह्यांतील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments